spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पावसाचा कहर, कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर विदर्भात यलो अलर्ट

सध्या महाराष्ट्र (Maharashtra) राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसानं (Rain) जोरदार हजेरी लावली आहे. पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. काही भागात पूरस्थिती(flood) निर्माण झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईसह(Mumbai) उपनगर ठाणे(Thane), पालघर (Palghar) परिसरात जोरदार पावसामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे

सध्या महाराष्ट्र (Maharashtra) राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसानं (Rain) जोरदार हजेरी लावली आहे. पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. काही भागात पूरस्थिती(flood) निर्माण झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईसह(Mumbai) उपनगर ठाणे(Thane), पालघर (Palghar) परिसरात जोरदार पावसामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तसेच राज्यातील कोकणसह (Kokan) विदर्भातील (Vidarbha) काही जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात जोरदार पावसाची (Heavy rain) शक्यता आहे. पाहुयात आज कोणत्या विभागात कोणता अलर्ट देण्यात आला आहे.

या भागात पावसाचा अंदाज

हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आज कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट (Orange Alert) देण्यात आला आहे. कोकणातील रायगड आणि रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. तर ठाणे जिल्ह्याला देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील (Western Maharashtra) पुणे (Pune) आणि सातारा (Satara) या जिल्ह्यांना देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. तसेच गोंदिया (Gondia) जिल्ह्याला देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. त्याचबरोबर सिंदुधुर्ग (Sindudhurg), कोल्हापूर (Kolhapur), विदर्भातील अकोला (Akola), अमरावती (Amravati), बुलढाणा (Buldhana), चंद्रपूर (Chandrapur), गडचिरोली (Gadchiroli), नागपूर (Nagpur), वर्धा (Wardha), वाशिम Washim), यवतमाळ (Yavatmal) या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस

हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळं वसमत (Wasmat) शहराजवळील तलाव फुटल्याने शहरात पाणीच पाणी झालं आहे. तथागत नगर आणि जुना गुरुद्वार एरियामध्ये पाणी शिरले आहे. तलाव फुटल्याने जवळपासच्या नागरिकांची तारांबळ उडाली आहे. तर पाणी घरात शिरल्याने घरातील संसार उपयोगी साहित्य त्याचबरोबर अन्नधान्य पाण्यात भिजले आहे. मुसळधार पावसामुळं वसमत शहरात पाणीच पाणी झाले आहे. आजही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Latest Posts

Don't Miss