spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मोठी बातमी ! पावसाळी अधिवेशनाची तारीख अखेर ठरली, या दिवसांमध्ये होणार अधिवेशन

मुंबई : महाराष्ट्र (Maharashtra State) राज्यात विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन (Monsoon Session Assembly) संदर्भात विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक आज पार पडली. या दरम्यान बैठली दरम्यान राज्यातील विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशनाची तारीख अखेर ठरली आहे. हे अधिवेशन बुधवार 17 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. याचा कालावधी 17 ते 25 ऑगस्ट 2022 पर्यंत असणार आहे. दरम्यान, 17 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या अधिवेशनासाठी विधानसभा कामकाज सल्लागार समितीवरील सदस्यांची नामनियुक्त यादी जाहीर करण्यात आली आहे.

यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री सर्वश्री राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, दादा भुसे, उदय सामंत, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानपरिषद व विधानसभा कामकाज सल्लागार समितीचे सदस्य, विधानमंडळ सचिवालय प्रधान सचिव राजेंद्र भागवत आदी उपस्थित होते.

17 ते 25 ऑगस्ट या कालावधीत अधिवेशन होणार असून यामध्ये शुक्रवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी दहीहंडी सुट्टी आणि दिनांक 20 व 21 ऑगस्ट या सार्वजनिक सुट्या आहेत. या दिवशी कामकाज होणार नाही. 24 ऑगस्ट रोजी विधिमंडळ कामकाजात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

हेही वाचा : 

Jagdeep Dhankhar : जगदीप धनखड हे उपराष्ट्रपती पदासाठी शपथबद्ध झाले

Latest Posts

Don't Miss