spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Shravan Special, उपवासाला बनवा भगरीचा खास पुलाव

नुकताच श्रावण महिना सुरु झाला आहे. हा महिना भगवान शंकरला समर्पित केला जातो. श्रावणातील सोमवारी अनेक जण उपवास करत असतात. श्रावणी सोमवारातील उपवासाला फार महत्त्व!

नुकताच श्रावण महिना सुरु झाला आहे. हा महिना भगवान शंकरला समर्पित केला जातो. श्रावणातील सोमवारी अनेक जण उपवास करत असतात. श्रावणी सोमवारातील उपवासाला फार महत्त्व! अनेक शिवप्रेमी श्रावणात उपवास करत असतात. अनेकदा उपवासात निवडक पदार्थ खाल्ले जातात. तसेच उपवासात अनेकदा भूक लागते आणि मग काय खावे असा प्रश्न पडतो. तसेच तेच तेच उपवासाचे पदार्थ खाऊन कंटाळा येतो, म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी उपवासाचा एक हटके खाद्यपदार्थ घेऊन आलो आहोत. या खाद्यपदार्थने तुमचे पोट भरलेले राहील व तुम्हला भूकही लागणार नाही. या पदार्थाचे नाव आहे भगरीचा पुलाव. हा पुलाव खायला फार चविष्ट लागतो. चला तर पाहुयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य:

एक कप भगर (bhagar)
एक कप शेंगदाणे (peanuts)
दोन बटाटे (potatoes)
एक चमचा जिरे (cumin)
दोन चमचे तूप (ghee)
4 हिरव्या मिरच्या (green chillies)
बारीक चिरलेली कोथिंबीर (chopped coriander)
दोन कप पाणी (water)
चवीनुसार मीठ (Salt)

कृती:

भगरीचा खास पुलाव बनवण्यासाठी सर्वप्रथम बटाटे धुवून ते कुकरमध्ये शिजवून घ्या. त्यानंतर भगर धुवून पाण्यात भिजवा. सुमारे १५ ते २० मिनिटांनंतर भगरमधील पाणी काढून टाका आणि झाकून ठेवा आणि काही काळ सोडा. या दरम्यान, भगरेचा भात तयार करण्यासाठी उर्वरित तयारी करा. उकडलेले बटाटे सोलून त्याचे छोटे तुकडे करून हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्या. आता गॅसवर एक कढई ठेवा आणि तूप घालून गरम करा. हे तूप गरम झाले की त्यात शेंगदाणे तळून घ्या. शेंगदाणे हलके तपकिरी झाल्यावर त्यांना एका भांड्यात काढून घ्या. यानंतर आता त्यात जिरे घाला आणि तडतडू द्या. नंतर बटाटे घालून थोडे मीठ टाका आणि बटाटे सुमारे दोन ते तीन मिनिटे तळून घ्या. यानंतर भगर घालून दोन्ही गोष्टी नीट मिक्स करा आणि आणखी दोन मिनिटे राहूद्या. आता त्यात पाणी घाला आणि चवीनुसार मीठ घाला आणि शेंगदाणे घाला आणि ते उकळू द्या. उकळल्यानंतर गॅस कमी करा आणि पॅन झाकून ठेवा. सुमारे २० ते २५ मिनिटे शिजू द्या. भगर शिजल्यावर गॅस बंद करा आणि गार्निशिंगसाठी वरून चिरलेली कोथिंबीर घाला. आता हा भगरीचा पुलाव गरम गरम खाण्यासाठी सर्व्ह करा.

हे ही वाचा:

Kaun Banega Crorepati 15, अखेर शूटिंगला सुरुवात…

 टीम इंडियाच्या नावावर नवीन वर्ल्ड रेकॉर्ड.

स्वानंदी टिकेकर-आशिष कुलकर्णीचा साखरपुडा थाटात संपन्न,पहा फोटोज

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss