spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मोहरमनिमित्त पुण्यातील वाहतुकीत उद्या होणार बदल

२९ जुलै रोजी मोहरमनिमित्त शनिवारी पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. मोहरमनिमित्त काढण्यात येणाऱ्या ताबूतांच्या मिरवणुकीमुळे शनिवारी दुपारनंतर शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे.

२९ जुलै रोजी मोहरमनिमित्त शनिवारी पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. मोहरमनिमित्त काढण्यात येणाऱ्या ताबूतांच्या मिरवणुकीमुळे शनिवारी दुपारनंतर शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. हा बदलांमुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन नागरिकांना वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.

मोहरमनिमित्त काढण्यात येणाऱ्या मुख्य मिरवणुकीचा प्रारंभ शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास शिवाजी रस्त्यावरील श्रीनाथ चित्रपटगृहाजवळून करण्यात येणार आहे. श्री दत्त मंदिर, बेलबाग चौक, बुधवार चौक, जिजामाता चौक, शनिवारवाडा, गाडगीळ पुतळा चौक, डेंगळे पूल, गाडीतळ चौक, आरटीओ चौकातून संगम पूल येथे मिरवणुक काढण्यात येणार आहे. तसेच लष्कर परिसरातील मिरवणुकीची सुरुवात दुपारी बाराच्या सुमारास करण्यात येणार असून ही मिरवणूक ताबूत स्ट्रीट येथून काढण्यात येणार आहे. सरबतवाला चौक, बाबाजान दर्गा, भोपळे चौक, महात्मा गांधी रस्ता, कोहिनूर चौक, नाझ हॉटेल चौक, नेहरु मेमोरिअल हॉल, समर्थ पोलीस ठाणे, पॉवर हाऊस चौक, अपोलो चित्रपटगृह, दारुवाला पूल, फडके हौद, मोती चौक, सोन्या मारुती चौक, बेलबाग चौकातून लष्कर भागातील ताबूत मुख्य मिरवणुकीत सहभागी होतील.

खडकी भागातील मिरवणूक बोपोडी चौकमार्गे पुढे जाणार आहे. दापोडी येथे मिरवणुकीची सांगता करण्यात येणार आहे. जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावरील पाटील इस्टेट परिसरातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. लष्कर भागातील इमामवाडा येथून सकाळी साडेदहाच्या सुमारास मिरवणूक काढण्यात येणार आहे. ताबूत, पंजे मिरवणूक मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. तसेच यावेळी मिरवणूक मार्ग वाहतुकीस बंद करण्यात येणार असून मिरवणूक मार्गस्थ झाल्यानंतर रस्ते वाहतुक खुले करण्यात येणार आहेत, असे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी सांगितले.

हे ही वाचा:

Amitabh Bachchan यांचे ‘ते’ ट्विट चर्चेत, चाहत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

प्रसिद्ध अभिनेत्याचे Facebook Page hack, पोस्ट करत दिली माहिती म्हणाला …

Dream Girl 2 चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss