spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Delhi-Mumbai Indigo Flight मध्ये महिला प्रवासीचे लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ४७ वर्षाच्या प्राध्यापकाला अटक

दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. अशीच रक घटना दिल्ली-मुंबई इंडिगो फ्लाईटमध्ये (Delhi-Mumbai Indigo Flight) एका प्रवासी महिलेसोबत घडली होती.

दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. अशीच रक घटना दिल्ली-मुंबई इंडिगो फ्लाईटमध्ये (Delhi-Mumbai Indigo Flight) एका प्रवासी महिलेसोबत घडली होती. इंडिगोच्या दिल्ली- मुंबई विमानामध्ये २५ जुलै २०२३ रोजी बुधवारी एका २४ वर्षीय महिला डॉक्टराचा विनयभंग करण्यात आल्याची घटना समोर आली होती. याप्रकरणी पोलिसांनी ४७ वर्षीय प्राध्यापकाला अटक केले होते. आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. यानंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली होती. या घटनेने विमानातून प्रवास करणाऱ्या महिला प्रवशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

मात्र आता लैंगिक अत्याचार प्रकरणी या ४७ वर्षीय प्राध्यापकाला सहार पोलिसांनी अटक (arrested) केली आहे. रोहित श्रीवास्तव असे आरोपी प्राध्यापकाचे नाव असून ते मूळचे पाटणाचे रहिवासी आहे. आरोपीला सध्या न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सहार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे ५.३०च्या सुमारास दिल्लीहून निघालेल्या फ्लाइटमध्ये श्रीवास्तव प्रवास करत होते. आरोपी आणि पिडीत डॉक्टर महिला विमानात एकमेकांच्या शेजारी बसले होते.फ्लाइट लँड होण्यापूर्वी प्रवासादरम्यान आरोपी श्रीवास्तवने महीलेला अनुचितपणे स्पर्श केला.

यावरून दोन्ही सहप्रवाशांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. हा वाद थांबवण्यासाठी क्रू मेंबरला (Crew member) यात हस्तक्षेप करावा लागला. विमान लँड झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी दोन्ही प्रवाशांना सहार पोलिस ठाण्यात नेले. यावेळी पिडीत महिलेचा जवाब नोंदवला गेला. त्यानंतर आरोपीविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ (विनयभंग) आणि कलम ३५४ अ (लैंगिक छळ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यांनतर आरोपी श्रीवास्तव यांना अटक करण्यात आली. दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता आता आरोपीला न्यायलयाकडून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

हे ही वाचा:

मुंबईकरांसाठी आनंददायक! Goregaon-Mulund Link Road चे काम सुरु,आता अंतर होणार कमी

प्रसिद्ध अभिनेत्याचे Facebook Page hack, पोस्ट करत दिली माहिती म्हणाला …

दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवीचा ‘Bholaa Shankar’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss