spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

नीरा देवधर धरणात कार कोसळली, तीन जण बुडाले

दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. त्यातच आता पुण्यात आणखीन एका अपघाताची (accident) नोंद झाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढत आहे.

दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. त्यातच आता पुण्यात आणखीन एका अपघाताची (accident) नोंद झाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढत आहे. घाट माथ्यावर तर मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यातच पुणे आणि रायगड जिल्ह्याला जोडणारा वरंधा घाट सध्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मात्र घाट बंद असतानादेखील काही नागरिक प्रशासनाच्या नियमांचे पालन न करता, वरंधा घाटातून धोकादायक पद्धतीने प्रवास करत असतात. यामुळेच आता एका गाडीचा वरांधा घाटात भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातून वरांधा घाट मार्गे कोकणात जाणारी एक गाडी नीरा देवधर धरणात कोसळली आहे.

वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेल्या घाटातून प्रवस करणे या वाहनचालकाला महागात पडले आहे. हे वाहन थेट धरणात कोसळली असून या कारमध्ये चौघेजण प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे. भोर महाड मार्गावरील वरंधा घाटात शिरगाव गावच्या हद्दीत एक मोटार निरा देवघर धरणाच्या पाण्यात पडली. आज २९ जुलै रोजी शनिवारी पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. या मोटारीत तीन पुरुष आणि एक महिला असे चौघेजण प्रवास करत होते. त्यापैकी एक जण बचावला आहे तर बाकीचे तिघेजण बुडाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अपघातग्रस्त हे पुण्यातील रावेत येथील असल्याचे समोर आले आहे. शासनाचे आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, भोरमधील सह्याद्री रेस्क्यू टीमचे (Rescue team) सदस्य आणि भोईराज मंडळाचे सदस्य हे पोलिसांसमवेत घटनास्थळी दाखल झाले आहेत.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक रेस्क्यू टीम (Rescue team) घटनास्थळी दाखल झाली असून आता घटनास्थळी पुढील कारवाई करण्याचे काम सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील हे वाहन वरांधा घाटातून जात असताना, पाऊस आणि धुक्यामुळे वाहन चालकाला रस्त्याचा अंदाज आला नाही आणि त्यामुळेच पुढच्याच क्षणाला ही गाडी कठडा तोडून नीरा देवधर धरणात कोसळली. दरम्यान पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून बाकी तीन जणांचा शोध चालू आहे.

हे ही वाचा:

मुंबईकरांसाठी आनंददायक! Goregaon-Mulund Link Road चे काम सुरु,आता अंतर होणार कमी

प्रसिद्ध अभिनेत्याचे Facebook Page hack, पोस्ट करत दिली माहिती म्हणाला …

Delhi-Mumbai Indigo Flight मध्ये महिला प्रवासीचे लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ४७ वर्षाच्या प्राध्यापकाला अटक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss