spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘RRR 2’ बद्दल मोठी अपडेट, लवकरच ‘या’ देशात शूटिंगला होईल सुरुवात

दाक्षिणात्य सुपरहिट चित्रपट RRR ने देशभर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. कमी वेळेत करोडोंचा गल्ला करत हा चित्रपट चित्रपटसृष्टीतील एक दर्जेदार चित्रपट ठरला. या ऐतिहासिक चित्रपटाचे दिग्दर्शन दक्षिण चित्रपटसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी केले होते.

दाक्षिणात्य सुपरहिट चित्रपट RRR ने देशभर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. कमी वेळेत करोडोंचा गल्ला करत हा चित्रपट चित्रपटसृष्टीतील एक दर्जेदार चित्रपट ठरला. या ऐतिहासिक चित्रपटाचे दिग्दर्शन दक्षिण चित्रपटसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी केले होते. तसेच या चित्रपटात एनटी रामाराव ज्युनियर, राम चरण, अजय देवगण, आलिया भट्ट, श्रिया सरन, समुथिराकणी, रे स्टीव्हन्सन आणि ऑलिव्हिया मॉरिस यांच्या महत्वाच्या भूमिका होत्या . या चित्रपटाने जगातील सर्वात मोठा चित्रपट पुरस्कार ऑस्कर २०२३ पटकावला. हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरला. चित्रपटाप्रमाणेच यातील गाणेही फार सुपरहिट ठरले होते.

या चित्रपटाची क्रेझ चाहत्यांमध्ये अधिक वाढली आहे. चित्रपटाचे यश पाहून आता निर्मात्यांनी त्याचा सिक्वेल जाहीर केला आहे. तेव्हापासून चाहते या चित्रपटाबद्दल येणारे अपडेट जाणुन घेण्यासाठी फार उत्सूक आहेत. आता राजामौली यांच्या RRRच्या सिक्वेलबाबत आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार सध्या ‘RRR 2’ या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर निर्माते आणि लेखक काम करत आहेत. त्यातच आता या चित्रपटाच्या शुटिंगबद्दल एक नवीन अपडेट समोर आली आहे. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचे शुटिंग आता लवकरच चालू होणार असून याचे शूटिंग आफ्रिकेत सुरु होणार आहे.

याबद्दल एसएस राजामौली यांचे वडिल विजयेंद्र प्रसाद यांनी खुलासा करत सांगितले होते की, या चित्रपटाच्या सिक्वेलची कथा आफ्रिकेत सुरू होईल. ‘RRR’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर, त्यांनी सीताराम राजू आणि कोमाराम भीम यांच्यासोबत ही स्टोरी आफ्रिकेत दाखवतील असा सिक्वेल बनवण्यात येइल. आता सध्या या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम चालू आहे. दरम्यान RRR नंतर आता RRR 2 साठी प्रेक्षक आतुर झाले आहेत. प्रेक्षकांना या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.

हे ही वाचा:

मालकारपूरमध्ये २ बसचा भीषण अपघात, ७ जणांचा जागीच मृत्यू, तर…

Delhi-Mumbai Indigo Flight मध्ये महिला प्रवासीचे लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ४७ वर्षाच्या प्राध्यापकाला अटक

मुंबईकरांसाठी आनंददायक! Goregaon-Mulund Link Road चे काम सुरु,आता अंतर होणार कमी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss