spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

महसूल दिनानिमित राज्यात ‘महसूल सप्ताहाचे’ आयोजन, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहीती

महसूल विभागाशी संबंधित सामान्य नागरिकांच्या तक्रारी तसेच अर्जावर कालमर्यादेत निपटारा होऊन सर्व सामान्य जनतेला अधिक चांगली व दर्जेदार सेवा उपलब्ध व्हावी या उद्देशाने १ ऑगस्ट महसूल दिनानिमित्ताने राज्यात ‘महसूल सप्ताहा’चे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.

महसूल विभागाशी संबंधित सामान्य नागरिकांच्या तक्रारी तसेच अर्जावर कालमर्यादेत निपटारा होऊन सर्व सामान्य जनतेला अधिक चांगली व दर्जेदार सेवा उपलब्ध व्हावी या उद्देशाने १ ऑगस्ट महसूल दिनानिमित्ताने राज्यात ‘महसूल सप्ताहा’चे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. या व्यापक अभियानातून विशेष मोहीमेद्वारे नागरीकांचे प्रश्न सोडवितानाच विभागाचे लोकाभिमुख काम गतीमान करण्याचा संकल्प आहे. या अभियानात प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि सामान्य नागरिकांनी सहभागी होऊन हे अभियान यशस्वी करण्याचे आवाहन राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

महसूल सप्ताहाच्या नियोजनासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी अप्पर जिल्हाधिकारी नोंदणी महानिरीक्षक जमाबंदी आयुक्त सर्व प्रांताधिकारी यांची दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून बैठक घेवून महसूल सप्ताहाच्या नियोजनाचा आढावा घेतला.सप्ताहाचे आयोजन केवळ शासकीय स्वरुपाचे न करता या माध्यमातून आपल्या विभागातील अधिकारी कर्मचार्यांचा लोकांशी संवाद कसा होईल असा प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.कार्यालय स्वच्छतेपासून ते विभागातील अधिकारी कर्मचारी यांचा सहभाग असलेले सांस्कृतिक साहीत्यिक आणि सेवाभावी उपक्रम आयोजित करण्याचेही त्यांनी सुचित केले.

चला करुया महसूल सप्ताह साजरा” या ब्रीद वाक्याने या महसूल सप्ताहाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. महसूल विभाग म्हणजे राज्य शासनाचे एक महत्त्वाचे अंग आहे. महसूल विभागाची नाळ हि आज तळागळातील जनतेशी थेट जुळलेली आहे. त्यामुळे महसूल विभागाने वर्षभर केलेल्या विविध लोकाभिमुख कामकाजाचा आढावा जनतेसमोर ठेवण्यासाठी दरवर्षी दि. १ ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून राज्यभरात साजरा करण्यात येतो. यावर्षी मात्र महसूल सप्ताहआयोजित करून या अभियानाला व्यापक स्वरूप देण्याचा निर्णय विभागाने घेतला असल्याचे स्पष्ट करून विभागाच्या माध्यमातून लोकाभिमुख उपक्रमाचे सात दिवस आयोजन केले असल्याचे सांगताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, महसूल विभागाच्या संबंधित सामान्य नागरिकांच्या तक्रारी तसेच अर्जांवर कालमर्यादेत निपटारा होऊन जनतेला अधिक चांगली दर्जेदार सेवा देण्याचा प्रयत्न सात दिवसात केला जाईल.याबरोबरच विभागाच्या वेगवेगळ्या निर्णयातून नागरीकांना न्याय देण्याचा प्रयत्न होईल.

या महसूल सप्ताहामध्ये एक आॅगस्ट रोजी या सप्ताहाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या उपस्थितीत करण्यात येणार असून,दोन आॅग्स्ट रोजी युवा संवादाच्या माध्यमातून महसूल विभाग महाविद्यालयां मध्ये जावून विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेवून मार्गदर्शन करेल तीन आॅगस्ट रोजी एक हात मदतीचा या उपक्रमातून गावपातळीवर सामान्य माणसाचे महसूल विभागाच्या संबधात काही प्रश्न जाणून घेवून सोडविण्यात येतील. माजी सैनिकांचे तसेच त्यांच्या कुटूबियांचे प्रश्न सोडविण्यासाठी सैनिक हो तुमच्यासाठी हा उपक्रम दि.५ आॅगस्ट रोजी आयोजित करण्यात येईल. महसूल विभागातील निवृत अधिकारी कर्मचारी त्यांचे कुटुबिय यांना बोलावून सन्मानित केले जाणार आहे.अधिकारी कर्मचारी यांच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार तसेच विभागात अधिकारी कर्मचारी चांगले कवी साहीत्यिक आहेत त्यांचे साहीत्यिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याबबातही मंत्री विखे पाटील यांनी सुचित केले.

राज्यात प्रथमच महसूल सप्ताहाच्या निमित्ताने संपूर्ण प्रशासन लोकांपर्यत घेवून जाण्याचा प्रयत्न आहे.नैसर्गिक आपतीचे आवाहन समोर असले तरी प्राप्त परीस्थिती लक्षात घेवून सप्ताहातील सर्व उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन करतानाच कार्यालय आणि परीसर स्वच्छता मोहीम,राईट टू सर्व्हीस कायद्याची अंमलबजावणी, सिक्स बंडल रेकाॅर्ड उपक्रम कार्यालयातील सेवेची कार्यप्रणाली या सप्ताहाच्या निमित्ताने तयार करावी आणि वरीष्ठ अधिकार्यानी एकदिवस दुर्गम भागात मुक्काम करून गावाचे प्रश्न जाणून घेण्याचे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले.

हे ही वाचा:

राहुल गांधी यांना राष्ट्रवादीचा पाठिंबा, रोहित पवार

अब्दुल सत्तार यांच्या अडचणीमध्ये वाढ

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss