spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

नाश्त्याला बनवा टेस्टी Masala Onion Laccha Paratha

पराठा हा खाद्यपदार्थ मुख्य पंजाब राज्याचा असून देशातील अनेक भागात तो आवडीने बनवला व खाल्ला जातो. देशात अनेक प्रकारेचे पराठे बनवले जातात. जसे की आलू पराठा, मेथी पराठा पण आज आपण घरात उपलब्ध असणाऱ्या कांद्यापासून रुचकर असा मसालेदार पराठा बनवणार आहोत.

पराठा हा खाद्यपदार्थ मुख्य पंजाब राज्याचा असून देशातील अनेक भागात तो आवडीने बनवला व खाल्ला जातो. देशात अनेक प्रकारेचे पराठे बनवले जातात. जसे की आलू पराठा, मेथी पराठा पण आज आपण घरात उपलब्ध असणाऱ्या कांद्यापासून रुचकर असा मसालेदार पराठा बनवणार आहोत. हा पराठा बनवायला अधिक जिन्नसांची गरज लागत नाही तसेच हा पराठा अगदी कमी वेळेत तयार होतो. चहासोबत तर हा पराठा खूपच छान लागतो. चला तर पाहुयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य:

गव्हाचे पीठ (wheat flour)
कांदा बारीक चिरलेला (Onion finely chopped)
मीठ (salt)
मिरची पावडर (Chilli powder)
ओरेगॅनो (Oregano)
चाट मसाला (Chaat masala)
जिरे (cumin)
आमचूर (amchur)
हळद (Turmeric)
धणे पावडर (Coriander powder)
बारीक चिरलेली कोथिंबीर (Finely chopped coriander)
तूप (ghee)

कृती :

मसाला कांदा लच्छा पराठा बनवण्यासाठी सर्वप्रथम पीठ मळून घ्या. यासाठी गव्हाच्या पिठात फक्त मीठ टाकून पीठ चांगले मळून घ्या. मासाला तयार होईपर्यंत पीठ काही वेळ तसेच ठेवा. आता मसाला टायर करण्यासाठी कांदा लांब चिरून घ्या. मग त्यात मीठ, तिखट, ओरेगॅनो, चाट मसाला, जिरे, आमचूर, हळद, धने पावडर टाकून नीट मिक्स करून घ्या. आता सेट झालेल्या पिठाचा गोळा घेऊन तो लाटून घ्या. आता संपूर्ण चपातीवर तयार केलेला कांदा मसाला भरून पसरवा आणि रोल करा. लाटून झाल्यावर ते फिरवून एका बाजूला बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर लावून लाटून घ्या. खूप पातळ करू नका. आता गॅसवर ताव ठेवून, तवा तापला की त्यात पराठा दोन्ही बाजूंनी चांगला खरपूस भाजून घ्या . भाजताना दोन्ही बाजूने वरून तूप लावा. चांगले भाजून झाल्यावर खाण्यासाठी सर्व्ह करा. हा पराठा तुम्ही दहीसोबत खाऊन याचा आस्वाद घेऊ शकता.

हे ही वाचा:

घरी बनवा हटके स्वीट कॉर्न पराठा

नाश्त्याला बनवा टेस्टी रवा-बेसनची चविष्ट टिक्की

Welcome 3 लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला, चित्रपटात झळकणार ‘हे’ कलाकार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss