spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

दोन विस्तारित मेट्रो मार्गाचे उद्घाटनं मोदींच्या हस्ते

लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार २०२३ भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पुण्यामध्ये सन्मानित करण्यात आला.

लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार २०२३ भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पुण्यामध्ये सन्मानित करण्यात आला. आजचा हा पुरस्कार दिपक टिळक यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. लोकमान्य टिळक ट्र्स्टच्यावतीनं लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त हा पुरस्कार दिला जातो. या कार्यक्रमाला व्यासपीठावर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे, ट्रस्टचे अध्यक्ष दिपक टिळक आदी उपस्थित होते. सर परशुराम भाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर हा सोहळा पार पडला. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्याच्या दोन विस्तारित मेट्रो मार्गाचे उद्घाटनं मंगळवारी पार पडलं.

‘वनाज ते रुबी हॉल’ आणि ‘सिव्हिल कोर्ट ते पिंपरी-चिंचवड मुख्यालय’ या मर्गांचा समावेश आहे. या विस्तारित मार्गांमुळं पुणेकरांचा प्रवास सुसह्य होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते गरवारे कॉलेज ते रुबी हॉल तसेच फुगेवाडी ते शिवाजी नगर सिव्हील कोर्ट या दोन विस्तारित मार्गाचं उद्घाटन करण्यात आले. यापूर्वी वनाझ ते गरवारे कॉलेज या मार्गाच आणि पिंपरी ते फुगेवाडी या मार्गाचं उद्घाटनं वर्षभरापूर्वी नरेंद्र मोदींच्या हस्ते झाले होते. वनाज ते सिव्हिल कोर्ट हा ८ किमीचा मार्ग आहे. या मार्गावरचा २२ मिनिटांचा प्रवास असेल. तर पिंपरी ते सिव्हील कोर्ट हा २५ किमी चा प्रवास आहे.

मेट्रोसाठी किती असणार तिकीट?

  • वनाज ते रुबी हॉल – २५ रुपये
  • वनाझ ते पुणे महापालिका – २० रुपये
  • रुबी हॉल ते पिंपरी – ३० रुपये
  • रुबी हॉल ते शिवाजी नगर – १५ रुपये
  • पिंपरी ते सिव्हील कोर्ट – ३० रुपये
  • वनाज ते रेल्वे स्टेशन – २५ रुपये
  • रुबी हॉल ते डेक्कन – २५ रुपये

हे ही वाचा:

Chandrayaan 3, जर चंद्राची कक्षा पकडली नाही तर चांद्रयान १० दिवसात पृथ्वीवर येईल परत

PM Modi Pune Visit – लोकमान्य टिळक पुरस्काराने नरेंद्र मोदींना पुण्यामध्ये सन्मानित

केंद्र सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर ८ ते १० ऑगस्ट दरम्यान संसदेत होणार चर्चा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss