spot_img
Sunday, September 22, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुख्यमंत्र्यांसह २० मंत्री करणार जिल्हानिहाय झेंडावंदन

त्यामुळे या २० मुख्यमंत्र्यांमध्ये यावेळी जिल्हानिहाय झेंडावंदनाची जबाबदारी

मुंबई: भाजप आणि शिंदे सरकारच्या बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळाचा विस्तारानंतर अजूनही खातेवाटपाचा प्रश्न प्रलंबित आहे. चप्रमाणे कुठल्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद कोणाकडे जाणार याचीही उत्सुकता आहे. स्वातंत्र्य दिनी संबंधित जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय कार्यक्रमात ध्वजारोहण केले जाते. मात्र पालकमंत्री नेमले नसल्याने त्याबाबत प्रश्न निर्माण झाला होता. पण या प्रश्नाचे उत्तर आता मिळाले आहे.

सध्या मुख्यमंत्र्यांसह एकूण २० मंत्री आहेत. त्यामुळे या २० मुख्यमंत्र्यांमध्ये यावेळी जिल्हानिहाय झेंडावंदनाची जबाबदारी वाटून देण्यात आली आहे. तर इतर सोळा जिल्ह्यांत विभागीय आयुक्त किंवा संबंधित जिल्हाधिकारी यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे.

सविस्तर यादी वाचा

  • देवेंद्र फडणवीस – नागपूर
  • सुधीर मुनगंटीवार – चंद्रपूर
  • चंद्रकांत पाटील – पुणे
  • राधाकृष्ण विखे पाटील – अहमदनगर
  • गिरीश महाजन – नाशिक
  • दादा भुसे – धुळे
  • गुलाबराव पाटील- जळगाव
  • रवींद्र चव्हाण – ठाणे
  • मंगलप्रभात लोढा – मुंबई उपनगर
  • दीपक केसरकर – सिंधुदुर्ग
  • उदय सामंत – रत्नागिरी
  • अतुल सावे – परभणी
  • संदिपान भुमरे – औरंगाबाद
  • सुरेश खाडे – सांगली
  • विजयकुमार गावित – नंदुरबार
  • तानाजी सावंत – उस्मानाबाद
  • शंभूराज देसाई – सातारा
  • अब्दुल सत्तार – जालना
  • संजय राठोड – यवतमाळ

दरम्यान, जिल्हानिहाय ध्वजारोहणाची जबाबदारी कुठल्या मंत्र्यावर आहे, हे स्पष्ट झाल्याने याच मंत्र्यांकडे पालकमंत्रिपदही जाणार, अशी चर्चा आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Latest Posts

Don't Miss