spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदावरून, महाविकास आघाडीत मतभेद

तब्ब्ल ४० दिवसांनंतर एकीकडे मंत्रिमंडळ हळू हळू स्थिर होत आहे. तर दुसरीकडे सत्ता जाताच महाविकास आघाडीतील (maha vikas aghadi) घटक पक्षांमध्ये धुसफूस सुरु झाली आहे.

मुंबई :- तब्ब्ल ४० दिवसांनंतर एकीकडे मंत्रिमंडळ हळू हळू स्थिर होत आहे. तर दुसरीकडे सत्ता जाताच महाविकास आघाडीतील (maha vikas aghadi) घटक पक्षांमध्ये धुसफूस सुरु झाली आहे. राज्यात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेने परस्पर ठरविल्याने आता काँग्रेससोबतच (Congress) राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाने सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे.

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनेचे अंबादास दानवे (Ambadas Danve of ShivSena as Leader of Opposition) यांची नियुक्ती करण्यात आली. विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती करताना शिवसेनेने मित्रपक्षांना विश्वासात घेतले नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या पदावर काँग्रेसचा दावा अद्याप कायम असल्याचे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती करताना शिवसेनेने मित्रपक्षांना विश्वासात घेतले नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

विधानसभेचे उपाध्यक्षपद आणि विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीकडे आहे. विधान परिषदेचे उपसभापतीपद शिवसेनेकडे आहे. यामुळे विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसने दावा केला होता. पण शिवसेनेने उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पत्र दिले आणि लगेचच दानवे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यावर अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले या काँग्रेस नेत्यांनी आक्षेप घेतला.

या पदावर काँग्रेसचा दावा अद्याप कायम असल्याचे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडी एकत्र असताना शिवसेनेने परस्पर विरोधी पक्ष नेतेपदासाठी त्यांच्या उमेदवाराचे नाव देणे, हे चुकीचं आहे. हे पत्र देण्यापूर्वी आम्हाला विश्वासात घेणे आवश्यक होते, असे मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. बाळासाहेब थोरातांच्या पाठोपाठच लगेच माजी मुख्यमंत्री अधिक चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे.

महाविकास आघाडीत एकोपा राहावा हीच आमची अपेक्षा असल्याचे मत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok chavan) यांनी व्यक्त केले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही शिवसेनेच्या भूमिकेबद्दल नापसंती व्यक्त केली. ते म्हणाले की दानवे यांची नियुक्ती करताना काँग्रेस पक्षाला विश्वासात घेण्यात आले नाही. त्यामुळे या निर्णयास आमचा विरोध असेल. त्यांनी चर्चा करायचीच नाही, अशी भूमिका घेतली असेल तर त्याला काय करणार?, पण एका विपरीत परिस्थितीमध्ये आम्ही महाविकास आघाडी सरकारमध्ये किमान समान कार्यक्रमाच्या आधारे सहभागी झालो होतो. आता त्यांना चर्चा करायची आहे की नाही हे त्यांनी ठरवावे. तसेच नाना पटोले यांनी महाविकास आघाडीच्या भवितव्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

 

हे ही वाचा :-

दोन दिवसात खातेवाटप होणार; मुनगंटीवारांनी तारीख सांगितली

Latest Posts

Don't Miss