spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पिंपरी-चिंचवड पोलीस भरती घोटाळ्यामध्ये ‘बीडचे कनेक्शन’

मागेच पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस भरती प्रक्रियेमध्ये घोटाळा (Police Bharti Scam) झाल्याचा प्रकार समोर आला होता. यावेळी पेपरफुटीचा प्रकार घडला होता. या पेपर फुटी प्रकरणांमध्ये याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मागेच पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस भरती प्रक्रियेमध्ये घोटाळा (Police Bharti Scam) झाल्याचा प्रकार समोर आला होता. यावेळी पेपरफुटीचा प्रकार घडला होता. या पेपर फुटी प्रकरणांमध्ये याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातच, आता याच प्रकरणात बीडचे (Beed) कनेक्शन असल्याचे समोर आले आहे. कारण या पेपर फुटीप्रकरणात बीड जिल्ह्यातील तब्बल ३३ जणांचा समावेश असून, आतापर्यंत पोलिसांनी वीस जणांना अटक केली आहे. तर यामधील १३ आरोपी अद्याप फरार आहेत.

पिंपरी-चिंचवडमध्ये झालेल्या या पोलीस भरती पेपर फुटी प्रकरणात एकूण १४९ आरोपी असल्याचे समोर आले असून, यातील ३३ आरोपी हे बीड (Beed) जिल्ह्यातील असल्याने पुन्हा एकदा पोलीस भरती पेपर फुटीचा बीड कनेक्शन उघड झाला आहे. २०१९ मध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये रिक्त पदाच्या भरतीसाठी जाहिरात (Advertising) प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर २०२१ मध्ये ही परीक्षा घेण्यात आली. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालया अंतर्गत झालेल्या या पोलीस भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे समोर आले होते. मैदानी आणि लेखी परीक्षेत हे गैरप्रकार झाले होते. या सर्व प्रकरणाची चौकशी केल्यानंतर १४९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये बीडमधील २० जणांचा समावेश आहे, तर यातील १३ जण हे फरार असून पोलिसांद्वारे त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

विशेष म्हणजे, यावर्षी घेण्यात आलेल्या पोलीस भरती प्रक्रियेमध्ये प्रकल्पग्रस्त असल्याचे बनावट प्रमाणपत्र सादर करून समांतर आरक्षणाचा लाभ घेण्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणात देखील गडचिरोली, यवतमाळ, लातूर, भाईंदरसह इतर ठिकाणी बीडच्या उमेदवारांवर याआधीही काही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यातच आता पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) पोलीस आयुक्तालय अंतर्गत झालेल्या पोलीस भरती प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले असून, यातही बीड कनेक्शन असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता संपूर्ण जिल्ह्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

हे ही वाचा:

Chandrayaan 3, जर चंद्राची कक्षा पकडली नाही तर चांद्रयान १० दिवसात पृथ्वीवर येईल परत

PM Modi Pune Visit – लोकमान्य टिळक पुरस्काराने नरेंद्र मोदींना पुण्यामध्ये सन्मानित

केंद्र सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर ८ ते १० ऑगस्ट दरम्यान संसदेत होणार चर्चा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss