spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘बस बाई बस’ कार्यक्रमात पंकजा मुंडे झाल्या भावुक, मी त्यांच्याशी बोलतच नाही कारण…

‘झी मराठी’ (zee marathi) या मराठी वाहिनीवरील ‘बस बाई बस’(bus bai bus) हा कार्यक्रम सध्या चांगलाच रंगतदार होताना दिसत आहे.

मुंबई :- ‘झी मराठी’ (zee marathi) या मराठी वाहिनीवरील ‘बस बाई बस’(bus bai bus) हा कार्यक्रम सध्या चांगलाच रंगतदार होताना दिसत आहे. अभिनेता सुबोध भावे सध्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. या कार्यक्रमाचे आतापर्यंत चार भाग प्रदर्शित झाले आहेत. तर त्यामध्ये सुप्रिया सुळे, अमृता खानविलकर, अमृता फडणवीस, मेधा मांजरेकर या सहभागी झाल्या होत्या. आता येत्या भागात या कार्यक्रमात भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि त्यांची बहीण प्रीतम मुंडे सहभागी होणार आहेत. नुकतंच या कार्यक्रमाचा एक प्रोमो प्रदर्शित करण्यात आला.

झी मराठी या वाहिनीने ‘बस बाई बस’ या कार्यक्रमाचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांच्या या कार्यक्रमाचा व्हिडीओ सध्या चांगला व्हायरल होत आहे. यावर विविध प्रतिक्रियाही उमटत असल्याचे दिसत आहे. त्या प्रोमोमध्ये अभिनेता सुबोध भावे हे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा करताना दिसत आहेत. यामध्ये विविध राजकीय घटना, पक्ष आणि इतर खाजगी आयुष्याबद्दल खुलासे करण्यात आले आहेत. यावेळी कार्यक्रमातील एका खेळादरम्यान पंकजा मुंडे यांना त्यांचे वडील गोपीनाथ मुंडे यांचा फोटो दाखवण्यात आला. हा फोटो पाहताच त्या भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी सुबोध भावेंनी पंकजा मुंडेंना तुम्हाला काय बोलायचे ते बोला, असे सांगितले. त्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या, मी काहीही बोलू शकत नाही. मी त्यांच्याशी बोलतच नाही. कारण त्यांनी आम्हाला असं अर्ध्यावर टाकायला नको होतं.

 

दरम्यान या कार्यक्रमात पंकजा मुंडेंना सुबोध भावेने राजकीय स्थितीबद्दल एक प्रश्न विचारला. दुसऱ्या पक्षातील आमदार कधी फोडलेत का? असा प्रश्न सुबोध भावेंनी विचारला होता. त्यावर पंकजा मुंडेंनी फ्लिमी स्टाईलमध्ये उत्तर दिलं. त्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या, “एक एक आमदार की किंमत तुम क्या जानो सुबोध बाबू.” पंकजा मुंडेंच्या या उत्तरावर प्रेक्षकांनी खळखळून हसत दाद दिली. तर सुबोध भावे यांनी वाह.. वा ! असे म्हटले. त्यांच्या या कार्यक्रमाचा व्हिडीओ सध्या चांगला व्हायरल होत आहे. यावर विविध प्रतिक्रियाही उमटत असल्याचे दिसत आहे.

हे ही वाचा :-

ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सच्या लोकांनी माझ्या घरात, कार्यालये उघडावीत – तेजस्वी यादव

 

 

Latest Posts

Don't Miss