spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Legends League Cricket : इंडिया महाराजा संघाची धुरा सांभाळणार ‘हा’ दिग्गज क्रिकेटपटू

Sourav Ganguly : भारताला स्वातंत्र्य मिळून यंदा 75 वर्षे पूर्ण होत असून, देशात अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. या निमित्ताने एक मोठा क्रिकेटचा सामना होणार आहे, ज्यामध्ये भारताच्या दिग्गज खेळाडूंनी भरलेला संघ जगातील मोठ्या खेळाडूंशी सोबत खेळणार आहेत. भारताकडून या संघाचे नेतृत्व अन्य कोणी नसून बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली करणार आहेत. हा सामना 16 सप्टेंबर रोजी कोलकाता येथील ऐतिहासिक ईडन गार्डन मैदानावर खेळवला जाणार आहे. हा सामना एक प्रदर्शनीय सामना ठरणार आहेत. जो लिजेंड्स क्रिकेट लीगच्या धर्तीवर खेळला जाईल. भारत महाराजाचे नेतृत्व सौरव गांगुली करतील, तर जागतिक दिग्गजांचे नेतृत्व इंग्लंडचे माजी कर्णधार इऑन मॉर्गन करतील.

लीजेंड्स क्रिकेट लीगमध्ये वर्ल्ड टीमकडून 10 देशातील खेळाडू सहभागी होणार आहे. ज्यात इंग्लंड, वेस्ट इंडीज, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, न्यूझीलंड, झिम्बाब्वे, बांग्लादेश, ऑस्ट्रेलिया, आयर्लंड आणि अफगाणिस्तानच्या खेळाडूंच्या समावेश आहे.

या सामन्याबाबत टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री म्हणाले, “भारत आपले स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष साजरे करत आहे, त्यामुळे ही अभिमानाची बाब आहे. म्हणूनच आम्ही यंदाची लीग स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला समर्पित करत आहोत.” त्यानंतर लिजेंड्स लीग क्रिकेटचे सह-संस्थापक रमन रहेजा म्हणतात, “या खास सामन्यानंतर लीग 16 सप्टेंबरपासून सुरू होईल, ज्यामध्ये चार वेगवेगळ्या संघ स्पर्धा करतील. ही संपूर्ण लीग 22 दिवस चालेल, लवकरच सर्व खेळाडूंची यादी जाहीर केली जाईल”. असे त्यांनी म्हणले.

हेही वाचा : 

MI चा संघ सोडत अर्जुन तेंडुलकर सामील होणार नव्या संघात

Latest Posts

Don't Miss