spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

लॉँग लास्टिंग नॅचरल ग्लोसाठी Follow करा ‘या’ टिप्स…

चांगली, सुंदर स्किन (healthy skin) हवी असल्यास लाइफस्टाइल आणि खाण्या पिण्याकडे विशेष लक्ष देणे महत्त्वाचे असते. आपण जे काही खातो, त्याचा थेट परिणाम आपल्या त्वचेवर दिसून येतो.

चांगली, सुंदर स्किन (healthy skin) हवी असल्यास लाइफस्टाइल आणि खाण्या पिण्याकडे विशेष लक्ष देणे महत्त्वाचे असते. आपण जे काही खातो, त्याचा थेट परिणाम आपल्या त्वचेवर दिसून येतो. बाजारात अशी अनेक उत्पादने आहेत, जी ग्लोईंग स्किनचा (glowing skin) दावा करतात. पण त्याचे अनेक साईड इफेक्ट्स होण्याचा धोकाही असतो. एवढेच नव्हे तर कॉस्मॅटिक उत्पादने बरीच महागही असतात, त्यामुळे बऱ्याच जणांना हे प्रॉडक्ट्स घेणे परवडत नाही. तसेच त्यातील केमिकल्स आपली त्वचाही खराब करू शकतात. पण आता तुम्ही काही स्किन केअर टिप्सच्या मदतीने नैसर्गिक चमक मिळू शकते. त्या कोणत्या ते जाणून घेऊयात.

हेल्दी डाएट (healthy diet)

हेल्दी डाएट केल्यामुळेही त्वचेला चमक मिळण्यास मदत होते. यासाठी रोजच्या आहारात फळं, भाज्या, पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा. तसेच जांभूळ, पालक, नट्स अशा अँटीऑक्सीडेंट युक्त पदार्थांचेही सेवन करावे. यामुळे त्वचेला आवश्यक पोषकतत्वे मिळतात आणि त्वचा डॅमेज होण्यापासून वाचते आणि ती चमकदारही होते.

पुरेसे पाणी प्यावे (Drink enough water)

शरीराला ८ ग्लास पाण्याची गरज असते. कमी पाणी पिल्यानेही अनेक आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळेच जास्तीत जास्त पाणी प्यावे. त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. यामुळे त्वचा तेजस्वी दिसते, तसेच नैसर्गिक चमकही मिळते. दररोज सुमारे ३ लिटर तरी पाणी प्ययले पाहिजे.

फेशिअल मसाज (Facial massage)

रक्ताभिसरण सुधारायचे असेल आणि चमकदार त्वचा हवी असेल तर फेशिअल मसाज हा एक उत्तम पर्याय ठरतो. यासाठी आपल्या हातांनी हळूहळू चेहऱ्याला मालिश करावे. अथवा तुम्ही यासाठी फेशिअल रोलरचा वापर करूनही चेहऱ्याला मालिश देऊ शकता. मालिश केल्याने चेहऱ्यावरील अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.

सनस्क्रीन लावावे (Apply sunscreen)

सूर्याच्या किरणांमुळेही त्वचेचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे बाहेर जाताना नेहमी सनस्क्रीन नेहमी लावावे. यासाठी कमीत कमी ३० एसपीएफ असलेल्या सनस्क्रीनचा वापर करावा. यामुळे सूर्याच्या प्रखर यूव्ही किरणांपासून त्वचेचे संरक्षण करता येते. तसेच यामुळे त्वचेला नैसर्गिक चमकही मिळते.

हे ही वाचा:

संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा Crispy Poha Nuggets

Dada Kondke, ‘दादा तुमची एकूण प्रॉपर्टी किती’? दादांनी उत्तर दिलं की…

Pink Colour, मुलींसाठी गुलाबी रंगचं का वापरला जातो ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss