spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर, सरपंचांची निवड आता थेट जनतेतून

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील एकूण 608 ग्रामपंचायतींचे सदस्य तसेच सरपंच पदाची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. ही निवडणूक 18 सप्टेंबर 2022 रोजी होणार असून 19 सप्टेंबर 2022 मतमोजणी करण्यात येईल. पावसाचे प्रमाण कमी असलेल्या विविध 51 तालुक्यांतील आणि 608 ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांसह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुका होणार. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. तसेच निवडणूक काळात या भागात जर अतिवृष्टी किंवा पूरस्थिती झाली तर याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली.

नामनिर्देशनपत्रांची छाननी 2 सप्टेंबर 2022 रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 6 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल. मतदान 18 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 19 सप्टेंबर 2022 रोजी होईल. दरम्यान, समर्पित मागासवर्ग आयोगाने शिफारस केलेल्या टक्केवारीच्या प्रमाणात या निवडणुकांसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा देय आहेत, अशी माहिती मदान यांनी दिली आहे.

हेही वाचा : 

Legends League Cricket : इंडिया महाराजा संघाची धुरा सांभाळणार ‘हा’ दिग्गज क्रिकेटपटू

Latest Posts

Don't Miss