spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

RRR च्या गाण्यवर नाचतानाचा करणवीर बोहराच्या मुलीचा व्हिडिओ होतोय व्हायरल

अभिनेत्रीने तिची मुलगी तारासाठी आयोजित केलेल्या पार्टीला आमंत्रित केल्याबद्दल माही विजचे आभार मानले.

करणवीर बोहराची धाकटी मुलगी जिया व्हेनेसा स्नो बोहरा हिचा एक व्हिडिओ ऑनलाइन शेअर केल्यानंतर लोकांची मने जिंकत आहे. या विडिओमध्ये करणवीर बोहराची धाकटी मुलगी RRR या प्रसिद्ध तेलगू सिनेमाच्या नातू नातू या गाण्याच्या हिंदी व्हर्जनवर अगदी मनमुराद आणि त्या गाण्याचा आनंद लुटत नाचताना दिसतं आहे.

जिया व्हेनेसा स्नो बोहरा हिची आई आणि करणवीर बोहराची पत्नी तीजय सिद्धूने तिच्या मुलींसाठी एक इंस्टाग्राम पेज सुरु केले आहे. ज्यात ती तिच्या मुलींचे काही विडिओ आणि फोटोज शेअर करत असते. याच इंस्टाग्राम पेजवर तिजय सिंधूने एक विडिओ शेअर केला. “माझी लहान मुलगी.तू किती मनोरंजक आहेस! मला तुझा आत्मविश्वास खूप आवडतो… तु तुला कोणी पाहत नाहीये अशा पद्धतीत नाचलीस पण, तुला प्रेक्षक असणे किती आवडते हे मला माहित आहे! काल तुझ्या मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत तू अगदी नॉनस्टॉप एनर्जीसह नाचलीस! मला वाटतं, आम्हा सर्वांपेक्षा तूच फक्त मनमुराद नाचलीस, तुझ्या आवडत्या गाण्याचा आस्वाद लुटलास. तिने आपल्या मुलीचा विडिओ शेअर करताना लिहिले.

अभिनेत्रीने तिची मुलगी तारासाठी आयोजित केलेल्या पार्टीला आमंत्रित केल्याबद्दल माही विजचे आभार मानले. “कालच्या एका शानदार मेजवानीसाठी @mahhivij धन्यवाद, आणि तिसर्‍या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिय @tarajaymahhi… आनंदी राहा आणि सर्वांचे आशीर्वाद तुला मिळोत!” सिद्धू यांनी लिहिले आहे.

हा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी पोस्ट करण्यात आला होता आणि तेव्हापासून तो व्हायरल झाला आहे. आत्तापर्यंत, अद्भुत क्लिपने 1.9 दशलक्षाहून अधिक व्हिवस जमा केले आहेत आणि संख्या झपाट्याने वाढत आहे. व्हिडिओमुळे लोकांनी वेगवेगळ्या कमेंट्स शेअर केल्या आहेत. अभिमानी बाबा करणवीर बोहरा यांनीही एक कमेंट शेअर केली आणि लिहिले, “अरे माझी बाहुली…. तुला नाचायला खूप आवडते.”

करणवीर बोहरानांतर या पोस्टवर आता अनेक कंमेंट्सचा पाऊस पडत आहे. “तिला फक्त त्या गाण्याचा आनंद घ्यायचा आहे… पूर्ण मस्तीमध्ये… अशी एक सुंदर लहान मुलगी,” एका इंस्टाग्राम वापरकर्त्याने व्यक्त केले. “हाहाहाहा……खूप मोहक,” दुसऱ्याने टिप्पणी दिली. “आतापर्यंतचे सर्वात गोड बाळ,” तिसऱ्याने प्रतिक्रिया दिली. “या लहान मुलानी सर्वात जास्त आनंद घेतला आहे,” चौथ्याने पोस्ट केले.

Latest Posts

Don't Miss