spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

IND vs WI T20, आज अंतिम लढाई आणि निर्णायक सामना, पहा दोन्ही संघाची प्लेईंग ११

भारत आणि वेस्ट इंडिज (India and West Indies) यांच्यातील पाच सामन्याच्या टी-२० मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना आज (रविवार, १३ ऑगस्ट) होणार आहे. सध्या दोन्ही संघ २-२ असे बरोबरीत आहेत. तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात भारताने सलग विजय मिळवत कमबॅक केले.

भारत आणि वेस्ट इंडिज (India and West Indies) यांच्यातील पाच सामन्याच्या टी-२० मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना आज (रविवार, १३ ऑगस्ट) होणार आहे. सध्या दोन्ही संघ २-२ असे बरोबरीत आहेत. तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात भारताने सलग विजय मिळवत कमबॅक केले. चौथा टी-२० सामना भारताने ९ गडी राखून जिंकला. आता पाचव्या सामन्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरणार आहेत. या सामन्यासाठी टीम इंडिया कदाचित प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करणार नाही.

चौथ्या सामन्यात भारतासाठी यशस्वी जायस्वाल (Yashasvi Jaiswal) आणि शुभमन गिल (Shubman Gill) यांनी दमदार सलामी दिली. दोघांनीही चमकदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले होते. यशस्वीने नाबाद ८४ धावा केल्या होत्या. शुभमनने ७७ धावांची खेळी केली होती. त्यामुळे निर्णायक सामन्यात भारत या दोन्ही फलंदाजांना संधी देऊ शकतो. चौथ्या सामन्यात संजू सॅमसनला (Sanju Samson) फलंदाजीची संधी मिळाली नाही. पण त्याआधीही तो टी-२० मध्ये काही खास करू शकला नाही. पण संजूला अखेरच्या सामन्यात संधी मिळण्याचीच शक्यता आहे.

तिलक वर्माने (Tilak Verma) आतापर्यंत आपल्या कामगिरीने सर्वांनाच प्रभावित केलेय. दुसऱ्या टी २० सामन्यात त्याने अर्धशतक ठोकले होते. तर पहिल्या सामन्यातही चमकदार कामगिरी केली होती. तिसऱ्या सामन्यात त्याने नाबाद ४९ धावांची खेळी केली. गिल-यशस्वीच्या धमाकेदार फलंदाजीमुळे चौथ्या सामन्यात तिलक वर्माला संधी मिळाली नव्हती. पाचव्या सामन्यातही तिलक याला संधी मिळू शकते. या सामन्यात तिलक महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. अक्षर पटेल (Akshar Patel) आणि कुलदीप यादव (Kuldeep Yadav) देखील प्लेइंग इलेव्हनचा भाग असू शकतात. अर्शदीप सिंहने (Arshdeep Singh) गेल्या सामन्यात ३ बळी घेतले होते. निर्णायक सामन्यात तो महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. मुकेश कुमारलाही (Mukesh Kumar) या सामन्यात खेळण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे भारतीय संघात बदलाची शक्यता नाहीच.

भारताची संभाव्य प्लेईंग ११

यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, युजवेंद्र चहल, मुकेश कुमार.

वेस्ट इंडिजची संभाव्य प्लेईंग ११

ब्रेंडन किंग, काइल मेयर्स, शाई होप, निकोलस पूरन (विकेटकीपर), रोवमन पॉवेल (कर्णधार), शिमरोन हेटमायर, जेसन होल्डर, रोमारियो शेफर्ड, ओडियन स्मिथ, अकील होसेन, ओबेड मैकॉय.

Latest Posts

Don't Miss