spot_img
Sunday, September 22, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मार्मिकच्या 62व्या वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरेंनी संबोधले, केंद्र व राज्य सरकारवर टीका

आज मुंबईतील दादर येथे मार्मिक या व्यंगचित्र साप्ताहिकाचा 62 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला आहे. यात त्यांनी व्यगंचित्रकार काय असतो, व्यगंचित्रकार काय करू शकतो याबाबत माहित दिली. त्याच बरोबर या साप्ताहिकाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे हे असून मुंबईत शिवसेना नसती तर देशात हिंदुत्वाचं काय झालं असतं असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. आणि याप्रसंगी त्यांनी केंद्र सरकार व राज्यसरकार यांच्यावर निशाणा साधाला आहे.

त्यानंतर शिवसेना आणि मार्मिक याकडे तरुणाई प्रचंड आकर्षण राहिली आहे. मार्मिकने लोकांच्या समस्यांना वाचा फोडली आहे. वयाने थकलेले तरी चालेल पण विचाराने थकलेलं नाही पाहिजे. आपण दीडशे वर्ष गुलामगिरीत काढली आणि त्यानंतर आपल्याला अनेक संघर्ष करून स्वातंत्र्य मिळालं. आपण आता स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करतोय, पण फक्त तिरंगा फडकावून देशभक्त होता येत नाही.” असा ठाकरे यांनी केंद्र सरकारला लगावला.

धक्कादायक घटना ! जळगावात अल्पवयीन भावानं केली बहिणीसह तिच्या प्रियकराची हत्या

चीन अमेरिका यांनी आधुनिकीकरण साठी सैन्य कपात केल्याचे ऐकिवात नाही. सरकार पाडायला पैसे आहेत पण लष्करासाठी नाही. नुसता तिरंगा लावून चीन परत जाणार का? घरावर तिरंगा हा लषकराला वाटायला हवे आम्ही सोबत आहोत. मला आज राजकीय बोलायचे नाही. पण महाराष्ट्रात आपत्ती असतांना सरकारचा पत्ता नाही मंत्र्यांचा पत्ता नाही मौज मजा सुरु आहे. असा केंद्र सरकार सहित राज्य सरकारवर उद्धव ठाकरे यांनी टोला लगावला आहे.

हेही वाचा : 

अडीच वर्षात पाच वर्षांची कामे करायचीत : देवेंद्र फडणवीस

Latest Posts

Don't Miss