spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

सध्याच्या देशातील परिस्थिती वरून खरंच स्वतंत्र उरलं आहे का?, जितेंद्र आव्हाड

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोद तथा नेते जितेंद्र आव्हाड यांनी आज बोलताना म्हणाले आहे की स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र आज स्वातंत्र्याच्या ७७ वा वर्धापन दिन साजरा करत असताना खरंच स्वतंत्र उरलं आहे का?

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोद तथा नेते जितेंद्र आव्हाड यांनी आज बोलताना म्हणाले आहे की स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र आज स्वातंत्र्याच्या ७७ वा वर्धापन दिन साजरा करत असताना खरंच स्वतंत्र उरलं आहे का? असा प्रश्न सध्या जनतेला पडला आहे. याला सध्या देशांमध्ये आणि महाराष्ट्रात असलेल्या परिस्थिती मुळे असा प्रश्न पडला आहे असे जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी म्हटले आहे.

जितेंद्र आव्हाड पुढे बोलताना म्हणाले की, ज्याप्रमाणे मणिपूर पेटवले गेले त्या ठिकाणी महिलांवर झालेला अत्याचार मात्र तरी देखील स्थानिक सरकार आणि केंद्र सरकार यावर काहीही बोलायला तयार नाही तर दुसरीकडे महाराष्ट्रात देखील अशाच प्रकारे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आज या देशात द्वेषचं राजकारण एवढं मोठ्या प्रमाणात सुरू आहे की माणुसकी उरणार की नाही असा प्रश्न पडला आहे. हे स्वातंत्र्य टिकवण्यासाठी आपल्याला आपली लोकशाही टिकवावी लागेल सध्या सर्वात मोठा हल्ला हा लोकशाहीवर होत आहे.

आजच पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे की मी पुन्हा येईल जर लोकशाही टिकवायची असेल तर आपल्याला यांना पुन्हा सत्तेवर येण्यापासून रोखले पाहिजेत तरच लोकशाही टिकवता येईल. महाराष्ट्र कधीही दिल्ली समोरं झुकला नाही आणि झुकणार देखील नाही. जेव्हा केव्हा हिमालय अडचणीत आला त्यावेळी मदतीला सह्याद्री मदतीसाठी धावून गेला आहे. शरद पवार साहेबांनी स्थापन केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्राच्या तळागाळात आहे. महाराष्ट्रातील जनता शरद पवार साहेबांच्या पाठीमागे आहे. यात माझ्या मनात कोणतीही शंका नाही आहे. लोकशाहीच्या शत्रूला पराभूत करण्यासाठी आतापासूनच तयारीला लागायला पाहिजे असेही देखील जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी म्हटले आहे.

ठाण्यातील कळवा येथे जिल्हा रुग्णालयात आतापर्यंत २७ रुग्ण दगावले आहे. मात्र राज्य सरकार यावर कुठलेही ठोस भूमिका घ्यायला तयार नाही आहे. रुग्णालयातील बेजबाबदार व्यक्तींवर तातडीने कारवाई करण्यात यावी यासंदर्भात आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना म्हटले आहे. मुख्यमंत्री ठाण्याचे असल्याने मी त्यांना ठाण्यातील एक नागरिक या नात्याने विनंती करतो की त्यांनी हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांवर तातडीने कारवाई करावी असे देखील जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

औरंगाबादमधील एक धक्कादायक बातमी!, पोलिस पथकाला गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न…

IND vs WI T20, आज अंतिम लढाई आणि निर्णायक सामना, पहा दोन्ही संघाची प्लेईंग ११

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss