spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

नारायण राणे यांनी साधला शेतकऱ्यांशी संवाद

आज देशाचा ७७ वा स्वातंत्र्यदिन आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. लाल किल्ल्यावरील आजच्या स्वातंत्र दिनाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १८०० विविध क्षेत्रातील व्यक्तींना बोलावलं होतं.

आज देशाचा ७७ वा स्वातंत्र्यदिन आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. लाल किल्ल्यावरील आजच्या स्वातंत्र दिनाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १८०० विविध क्षेत्रातील व्यक्तींना बोलावलं होतं. त्यात खादी ग्रामोद्योग, शिल्पकार, कारागीर, शेतकरी, तंत्रज्ञान अशा वर्गातील व्यक्तींचा समावेश होता. आज स्वातंत्र्य दिनाचा सोहळा झाल्यानंतर आलेल्या विशेष अतिथींशी संबंधित केंद्रीय मंत्र्यांनी संवाद साधला. केंद्रीय लघू, मध्यम आणि सुक्ष्म मंत्री नारायण राणे यांनी या अतिथींशी संवाद साधला तेव्हा त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

भारताच्या वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या तुमच्या सगळ्यांच स्वागत करतो. आज पंतप्रधान मोदी यांनी आपल्या सगळ्यांसमोर विश्वकर्मा योजनेची घोषणा केली आहे. त्याचा आपल्या सगळ्यांना फायदा होणार आहे. भारताच्या सगळ्या ठिकाणावरून लोक या कार्यक्रमासाठी आले आहेत. आपली जुनी कला आपल्याला जपून ठेवायची आहे. त्यासाठी पंतप्रधान यांनी या योजनेची घोषणा केली आहे. ही योजना १७ सप्टेंबर ला सुरू होणार आहे. प्रत्येकाच्या व्यवसायासाठी या योजनेचा फायदा होणार आहे, असं नारायण राणे म्हणालेत. आपले पंतप्रधान ९ वर्ष देश चालवत आहेत. आतापर्यंत विविध क्षेत्रातील लोकांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. पंतप्रधान फक्त घोषणा सुरू करत नाहीत तर त्याची पूर्तता करतात. आता २०२३आहे पुन्हा ५ ते १० वर्षांनी भेटू तेव्हा नक्की आठवण ठेवा. तेव्हा हे लोक मोठे उद्योजक बनले आणि तेव्हा त्यांनी मला हे सांगितलं तर मला आनंद होईल. येणाऱ्या काळात भारत तिसऱ्या स्थानावर येईल हे पंतप्रधान यांनी आपल्याला आज सांगितलं. आम्हाला यावर विश्वास आहे. आपला देश त्या दिशेने पावलं टाकत आहे, असंही नारायण राणे म्हणाले आहेत.

स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याती विशेष अतिथी म्हणून आलेल्या शेतकऱ्यांशी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर, नारायण राणे यांनी कारागीर, खादी ग्रामद्योगासंबधीत व्यक्तींशी साधला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कारागीरांच्या समजून घेत त्यांचे म्हणणं ऐकून घेतलं. यावेळी त्यांनी स्वातंत्र्यदिनावर भाष्य केलंय. आज ७७ वा स्वतंत्र दिवस आहे, देशाचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या प्रगतीबद्दल, सर्वांच्या प्रगतीबद्दल विचार मांडले. कारागिरांच्या प्रगतीसाठी पंतप्रधान विश्वकर्मा योजनेची घोषणा केली आहे, असं नारायण राणे म्हणालेत. 36 जण एकत्र येऊन काही फायदा होत नाही. महाविकास आघाडीत ते तिघे होते. तरी ते काही करू शकले नाहीत. आमचे आमदार कमी जास्त झाले तरी काही होऊ शकत नाही. काँग्रेसचे काहीजण आमच्याकडे येणार आहेत, असं नारायण राणे म्हणालेत.

हे ही वाचा:

पुण्यातील पर्यटन ठिकाणी जाणाऱ्यांसाठी १०१ अतिरिक्त बसेसची सोय…

काही मिनिटांमध्येच शेतकऱ्यांना मिळणार मदतीचा हात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss