spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Bigg Boss OTT 2 Winner, बिग बॉस ओटीटी’चे दुसरे पर्व ठरले ऐतिहासिक

जवळपास आठ आठवड्यांच्या धमाकेदार सिझननंतर बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या (Bigg Boss OTT 2) सिझनचा ग्रँड फिनाले सोमवारी म्हणजेच काल पार पडला. बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच वाइल्ड कार्ड एण्ट्री (Wild card entry) घेणाऱ्या स्पर्धकाने ट्रॉफी जिंकली. युट्यूबर एल्विश यादवने (Youtuber Elvish Yadav) बिग बॉस ओटीटी २ चं विजेतेपद जिंकलं. घरात एण्ट्री करताच एल्विशने आपली दमदार खेळी दाखवली. बिग बॉसच्या घराबाहेरही एल्विशला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळालं. सोशल मीडियावर त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. इन्स्टाग्रामवर (Instagram) त्याचे तब्बल १३.७ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. तर हरयाणाचा एल्विश हा कोट्यवधींचा मालक आहे. अवघ्या २५ व्या वर्षी एल्विशने हे यश संपादन केलं आहे.

बिग बॉसच्या घरातून टॉप ५ मधून पूजा भट (Pooja Bhat), बेबीका धुर्वे (Babika Dhurve), मनिषा रानी (Manisha Rani) या रेसमधून बहर गेल्या. तर फुकरा इन्सान म्हणजे अभिषेक मल्हान (Abhishek Malhan) आणि एल्विश यादव टॉप २ स्पर्धक झाले. अभिषेक मल्हान सुरुवातीपासूनच या घरात होता पण एल्विश यादवने या स्पर्धेत उशीर एन्ट्री घेतली. परंतु काही दिवसात त्याने शोवर कब्जा केला. या दोन दमदार स्पर्धकांपैकी कोण जिंकणार याची उत्सुकता प्रेक्षकांनासह ‘बिग बॉस’मधील इतर स्पर्धकांना देखील होती. अखेर तो निर्णायक क्षण आला आणि ‘बिग बॉस ओटीटी २’ला विजेता मिळाला. सोशल मीडियावर राज्य करणारा किंग एल्विश यादव ‘बिग बॉस ओटीटी २’चा विजेता ठरला आहे. बिग बॉसच्या सुंदर ट्रॉफीसह त्याला २५ लाख रुपये मिळाले आहेत. एल्विशने त्याची ट्रॉफी अभिषेक मल्हान आणि मनिषा रानीसोबत शेअर केली आहे.

सुरुवातीला एल्विश यादव रोस्टिंगचे (roasting) व्हिडीओ बनवायचा. यादरम्यान त्याने बऱ्याच सेलिब्रिटींनाही रोस्ट केलं होतं. एका व्हिडीओवरून अभिनेत्री स्वरा भास्करने (Swara Bhaskar) त्याच्याविरोधात तक्रारसुद्धा दाखल केली होती. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरसोबतच (influencer) तो एक एनजीओसुद्धा (NGO) चालवतो. इतकंच नव्हे तर त्याचा स्वत:चा कपड्यांचा ब्रँडसुद्धा आहे. यातूनही तो चांगली कमाई करतो. याबद्दलची माहिती त्याने स्वत: बिग बॉसच्या घरात दिली होती. एल्विश यादव दर महिन्याला जवळपास ८ ते १० लाख रुपयांची कमाई करतो. त्याला महागड्या आणि आलिशान गाड्यांची खूप आवड आहे. त्याच्या कलेक्शनमध्ये फॉर्च्युनर, ह्युंडाइ वेर्ना, सेडान आणि पोर्शे या गाड्यांचा समावेश आहे.

हे ही वाचा:

राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यावर अजित पवार म्हणाले…

सध्याच्या देशातील परिस्थिती वरून खरंच स्वतंत्र उरलं आहे का?, जितेंद्र आव्हाड

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss