Tuesday, September 24, 2024

Latest Posts

स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी पुणेकरांचा मेट्रो सफर सुसाट, पुणेकरांची मेट्रोत प्रचंड गर्दी…

स्वातंत्र्य दिन आणि सुट्टी असल्याने अनेक पुणेकर मेट्रो (Pune Metro) प्रवास करताना दिसत आहे. पुण्यातील मेट्रो स्थानकावर मोठ्या प्रमाणात पुणेकरांची गर्दी बघायला मिळत आहे. वनाज ते रुबी हॉल क्लिनीक या मार्गावरील शिवाजी नगर स्थानकावर गर्दी बघायला मिळत आहे.

स्वातंत्र्य दिन आणि सुट्टी असल्याने अनेक पुणेकर मेट्रो (Pune Metro) प्रवास करताना दिसत आहे. पुण्यातील मेट्रो स्थानकावर मोठ्या प्रमाणात पुणेकरांची गर्दी बघायला मिळत आहे. वनाज ते रुबी हॉल क्लिनीक या मार्गावरील शिवाजी नगर स्थानकावर गर्दी बघायला मिळत आहे. सुट्टी असल्याने अनेक पुणेकर खास मेट्रोचा अस्वाद घेण्यासाठी आणि आपल्या पाल्यांना मेट्रोची सफर घडवण्यासाठी पोहचल्याचं दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी मेट्रोच्या दोन मार्गिकांचं लोकार्पण केलं. त्यानंतर पुणेकरांनी मेट्रोला चांगला प्रतिसाद दिला. पुणेकरांनी वनाज ते रुबी हॉल आणि सिव्हिल कोर्ट ते फुगेवाडी या मार्गावर प्रचंड गर्दी केल्याचं बघायला मिळत आहे. पुणेकरांसाठी मेट्रो नवीन आहे. त्यामुळे काही पुणेकर खास मेट्रोची सफर करण्यासाठी प्रवास करताना दिसत आहेत. पुण्यातील मेट्रो स्थानकदेखील ऐतिहासिक बनवले असल्याने इतिहासासोबतच भविष्याच्या धोरणांची माहिती अनेक पालक या मेट्रो प्रवासादरम्यान आपल्या पाल्यांना देताना दिसत आहे. सुट्टी आणि त्यात स्वातंत्र्य दिन हा मुहूर्त साधत पुणेकरांनी मेट्रोत तुडुंब गर्दी केली आहे.

पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. पुणे मेट्रो आता सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत सुरू राहणार आहे. पुणे मेट्रो आपली प्रवासी सेवा प्रवाशांच्या सोयीसाठी सकाळी १ तास लवकर सुरू करीत आहे. वेळापत्रकाचा बदल हा वनाझ स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक स्थानक या मार्गावर लागू करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते सिव्हिल कोर्ट स्थानकाच्या वेळेमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या मार्गावरील सेवा सकाळी ७ ते रात्री १० अशीच सुरू असणार आहे.

पुणे मेट्रोचं वेळापत्रक कसं असेल?

  • वनाझ स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक मार्ग
  • सकाळी ६ ते ८ – दर १५ मिनिटांनी
  • सकाळी ८ ते ११ – दर १० मिनिटांनी
  • सकाळी ११ ते दुपारी ४ – दर १५ मिनिटांनी
  • दुपारी ४ ते रात्री ८ – दर १० मिनिटांनी
  • रात्री ८ ते १० – दर १५ मिनिटांनी

हे ही वाचा:

‘सुभेदार’ चित्रपटाची रिलीज डेट ढकलली पुढे …

ठाण्यात आणि मुलुंडमध्ये काय आहे मध्यरात्रीच्या ध्वजारोहणाची परंपरा?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss