Tuesday, September 24, 2024

Latest Posts

१५ महिन्यात तुटला भाज्यांवरील महागाईचा रेकॉर्ड…

जुलै (July) महिन्यात रिटेल महागाईचा (Retail Inflation) दर कमी असेल, असा दावा आणि अंदाज व्यक्त करण्यात येत होता. पण किरकोळ महागाईने हे सर्व अंदाज, दावे गुंडाळून ठेवले. गेल्या १५ महिन्यात महागाईने दूरचा टप्पा गाठला.

जुलै (July) महिन्यात रिटेल महागाईचा (Retail Inflation) दर कमी असेल, असा दावा आणि अंदाज व्यक्त करण्यात येत होता. पण किरकोळ महागाईने हे सर्व अंदाज, दावे गुंडाळून ठेवले. गेल्या १५ महिन्यात महागाईने दूरचा टप्पा गाठला. महागाईत सातत्याने वाढ होत आहे. केंद्र सरकारचे प्रयत्न सुरु असले तरी त्याला म्हणावे तसे यश मिळालेले नाही. किरकोळ महागाईत खरा खलनायक टोमॅटो (Tomato Hike) ठरला आहे. त्यासोबतच इतर भाज्यांनी सुद्धा मोठी भूमिका निभावली आहे. जुलै महिन्यातच भाज्यांची महागाई ३७.३४ टक्के नोंदविण्यात आला. जुलै महिन्यात शहरांपेक्षा ग्रामीण भागातील महागाई जास्त होती. शहरात किरकोळ महागाई ७.२ टक्के होता तर गावात हा दर ७.६३ टक्के होता. त्यामुळे महागाई आटोक्यात आणण्याच्या केंद्र सरकारच्या सर्व प्रयत्नांवर पाणी फेरले गेले.

देशात या वर्षात महागाईने कळस गाठला. त्यात भाज्यांनी मोठी भुमिका निभावली. किरकोळ महागाई तर सूसाट धावली. महागाई दराने मोठा पल्ला गाठला. किरकोळ महागाई दर १५ टक्क्यांनी वाढला. टोमॅटोनी त्यात सर्वाधिक भर घातली. जुलैमध्ये किरकोळ महागाई दर दर ७.४४ टक्के नोंदविण्यात आला. गावात महागाई दर ७.६३ टक्के होता तर शहरात किरकोळ महागाई ७.२ टक्के होता. भाजीपाल्याशिवाय महागाईत इतर घटकांनी तेल ओतले. त्यात मसाले, डाळी, दूध आणि धान्यांचे मोठे योगदान आहे. म्हणजे सर्वसामान्यांचे किचन बजेट कोलमडून पडले आहे. मसाल्याचे भाव २१.६३ टक्के नोंदविण्यात आले. डाळींची महागाई १३.२७ टक्के, धान्य महागाई १३.०४ टक्के तर दुधाची महागाई ८.३४ टक्के नोंदविण्यात आली. जुलै महिन्यात मुसळधार पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे पुरवठ्याची साखळी विस्कळीत नाही, खंडीत झाली. डाळी आणि मसाला पदार्थांच्या कमी उत्पादनामुळे भाव वाढले.

यापूर्वी महागाईसंबंधीचे सर्व अंदाज फेल गेले आहे. पण यावेळी समाधानकारक पावसामुळे देशातील किरकोळ महागाई दर कमी होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. ऑगस्ट (August) महिन्याच्या शेवटी या किंमतीत घसरण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पण डाळी, धान्य आणि मसाला पदार्थांमध्ये कोणताही दिलासा मिळण्याची शक्यता एकदम कमी आहे.

हे ही वाचा:

स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी पुणेकरांचा मेट्रो सफर सुसाट, पुणेकरांची मेट्रोत प्रचंड गर्दी…

Sharad Pawar-Ajit Pawar यांच्या भेटींवर सुप्रिया सुळे म्हणाल्या…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss