spot_img
Tuesday, September 24, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Nagpanchami 2023, नागपंचमी स्पेशल खास बेत घरीच करा टेस्टी आणि स्वादिष्ट दाल बाटी…

श्रावण (Shravan) महिन्यातील पहिला महत्त्वाचा सण नागपंचमी (Nagpanchami) आहे. या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरत धरत नाही.

श्रावण (Shravan) महिन्यातील पहिला महत्त्वाचा सण नागपंचमी (Nagpanchami) आहे. या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरत धरत नाही. शेतातली कोणीही जागा खंदत नाही, शेताला खुरपं लावत नाही,भाज्या चिरत नाही, तवा चुलीवर ठेवत नाही, असे काही नियम पाळत असतात. अशात या दिवशी जेवायला काही तरी वेगळं आणि स्वादिष्ट करायला हवं हे ही तेवढंच खरं. मग पाहू या घरीच नागपंचमीला भन्नाट पदार्थ कसा तयार करायचा ? नागपंचमी स्पेशल आज आपण पाहणार आहोत दाल बाटी कशी तयार करायची ?

साहित्य:

  • एक किलो गव्हाचे जाडं पीठ
  • एक चमचा दही
  • मीठ चवीप्रमाणे
  • तेल (मोहन)
  • सोडा
  • हळद
  • एक वाटी तूर डाळ
  • वरणाला फोडणी देण्याचे साहित्य

कृती:

दाल बाटी बनविण्यासाठी सर्वप्रथम परातीत गव्हाचे जाडं पीठ, दही, मीठ, चिमूटभर सोडा, थोडीशी हळद आणि मोहन टाकून हे पीठ कोमट पाण्याने घट्ट मळून घ्यावे. मळलेलं पीठ अर्धा तास मुरू दयावं. पीठ चांगल मुरलं की त्या पीठाचे अंदाजे लाडू एवढ्या आकाराचे गोळे तयार करून त्यांना १० ते १५ मिनिटे गॅसवर पातेल्यात पाणी ठेवून वाफवून घ्यावं. शिजलेल्या बाट्या बाहेर काढून ५ मिनिटे थंड होऊ द्याव्या. नंतर मग ओव्हनमध्ये किंवा मायक्रोवेव्हमध्ये ठेवून बाट्या दोन्ही बाजूनी छान शेकून घ्या. बाट्या खरपूस शेकून झाल्या की थोडं गार होऊ द्या, मग हाताने तोडून त्यात भरपूर साजुक तूप घाला. आपल्या आवडीप्रमाणे तूर डाळीचे फोडणीचे वरण तयार करून त्याबरोबर बाट्यावर ताव मारावा. अशाच प्रकारे एक्दम सोप्या पद्धतीने नागपंचमी स्पेशल असा आपला खास बेत दाल बाटी तयार.

हे ही वाचा:

IND vs IRE, टीम इंडियाचा आयर्लंड दौरा, बुमराह सांभाळणार संघाची धुरा… स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी पुणेकरांचा मेट्रो सफर सुसाट, पुणेकरांची मेट्रोत प्रचंड गर्दी…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss