spot_img
Monday, September 16, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Chandrayaan-3 सॉफ्ट लँडिंगपासून केवळ एका कक्षेच्या अंतरावर, जाणून घ्या सविस्तर…

भारताचे महत्त्वाकांक्षी मिशन चांद्रयान-३ चंद्राच्या दिशेने शेवटच्या कक्षेत पोहोचले आहे. हाच तो क्षण आहे जिथून चांद्रयानच्या प्रवासात महत्त्वाचे पण निर्णायक बदल घडणार आहेत.

भारताचे महत्त्वाकांक्षी मिशन चांद्रयान-३ चंद्राच्या दिशेने शेवटच्या कक्षेत पोहोचले आहे. हाच तो क्षण आहे जिथून चांद्रयानच्या प्रवासात महत्त्वाचे पण निर्णायक बदल घडणार आहेत. इस्रोच्या म्हणण्यानुसार, या कक्षेत पोहोचल्यानंतर ते लँडर वेगळे करण्याची प्रक्रिया सुरू करतील.

ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, आज इंजिन यशस्वीरित्या चालू केल्यानंतर त्याने चंद्राच्या दिशेने जाणारी एक कक्षा पूर्ण केली आहे. आता त्याचे अंतर १५३ किमी x १६३ किमी राहिले आहे. येथून लँडर वेगळे केले जाईल आणि १७ ऑगस्टपासून आणखी एक फेरी पूर्ण केल्यानंतर या मिशनच्या कारकिर्दीचा स्वतंत्र प्रवास सुरू होईल. सर्व काही ठीक राहिल्यास, लँडर त्याच्या वेळापत्रकानुसार २३ ऑगस्ट रोजी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करेल.

आपण चंद्राच्या अगदी जवळ पोहोचलो आहोत, असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र प्रसाद यांनी म्हटले आहे. इस्रोच्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की जर सर्व काही ठीक झाले तर येत्या काही दिवसांत त्यांचे लँडर चंद्रावर असेल. या यशामुळे चंद्राच्या प्रवासासाठी पुढील मार्ग खुले होतील. हे मिशन यशस्वीरित्या पूर्ण झाल्यास भारत हा पराक्रम करणारा जगातील चौथा देश ठरेल. इतकेच नाही तर कोणत्याही अवजड रॉकेटशिवाय हे मिशन पूर्ण करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरणार आहे. याशिवाय, भारताच्या खात्यात आणखी एक यश येणार आहे, ज्यानुसार सर्वात कमी खर्चात हे मिशन राबविणारा भारत देश असेल.

हे ही वाचा:

पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाची इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करणारे मुंबईतील दोन तरुण अटकेत…

पनवेलमध्ये मनसेचा आज निर्धार मेळावा, काय बोलणार Raj Thackeray?

हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ६५ जणांचा मृत्यू तर…

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss