Wednesday, September 25, 2024

Latest Posts

संजय राऊत म्हणाले, शरद पवार हे त्यांच्या हयातीमध्ये भाजपसोबत हातमिळवणी करतील…

यावेळी माध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊत म्हणाले आहेत की, या सर्व अफवा आहेत. शरद पवार हे महाविकास आघाडीचे महत्वाचे नेते आहेत आमचे मार्गदर्शक आणि आमचे नेते आहेत.

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी या घडत आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते म्हणून ओळखले जाणारे अजित पवार यांनी राष्ट्रवादी मधून काढता पाय घेतला आणि शिंदे फडणवीस सरकारसोबत एकत्रित झाले. गेल्या महिन्याच्या २ तारखेला अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. असं असतानाच २ ते ३ दिवसांपूर्वी पुण्यात एका व्यावसायिकाच्या बंगल्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक झाली. या बैठकींनंतर अनेक ठिकाणी चर्चाना उधाण आले होते. तर संजय राऊत यांनी देखील त्यांची प्रतिक्रिया ही दिली आहे.

यावेळी माध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊत म्हणाले आहेत की, या सर्व अफवा आहेत. शरद पवार हे महाविकास आघाडीचे महत्वाचे नेते आहेत आमचे मार्गदर्शक आणि आमचे नेते आहेत. काल रात्री त्यांची आणि माझी फोनवरून चर्चा झाली. शरद पवार सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. ते सोलापुरात होते तिथे त्यांचे स्वागत झाले. आज ते पक्ष बांधणीसाठी संभाजीनगर ला आहेत. काही कौटुंबिक अडचणी आणि कौटुंबिक कामासाठी अजित पवार आणि शरद पवार भेटले अशी माझी माहिती आहे. पवारांचे कुटुंब मोठे आहे. यावर मी अधिक बोलायला नको. पण याचा राजकारणावरती आम्ही कोणताही परिणाम होऊ देणार नाही. महाविकास आघाडी मजबुतीने उभी आहे .काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तीन पक्ष एकत्र आहेत आणि राहतील महाविकास आघाडी तेही राहतील आणि इंडिया अलायन्स मध्ये देखील राहतील. त्याच्यामुळे अजित पवारांच राजकारण अजित पवारांकडे असो. आम्ही एकत्र आहोत आणि एकत्र राहणार असं देखील राऊत म्हणाले आहेत.

तसेच संजय राऊत पुढे म्हणाले आहेत की, आज पासून चार दिवस महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी,जिल्हा प्रमुख, संपर्कप्रमुख, विधानसभेचे पदाधिकाऱ्यांच्या बैठका आज पासून नक्कीच उद्धव ठाकरे यांच्यानेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली होत आहेत. पुढील चार दिवसात संपूर्ण महाराष्ट्र पुन्हा एखदा त्याची झडाझडती घेतली जाईल मग पुढची पावलं टाकली जातील. तसेच ते पुढे म्हणाले आहेत की, आम्ही सुद्धा भेटणार आहोत. सर्वात आधी त्यांना स्थिरस्थावर होऊ दे इतक्या वर्षांनी ते आले आहेत त्यांना काही काळ कुटुंबाला देऊ दे. या संपूर्ण काळात त्यांचे कुटुंबीय मी माझ्या घरात ही पाहायला आहे. त्यांना त्यांचा वेळ घालवू द्या राजकारण करायला खूप वेळ आहे. पुढील दोन दिवसात मीही त्यांना जाऊन भेटणार आहे.

तसेच संजय राऊत पुढे म्हणाले आहेत की, अजित पवार हे कधी इतके मोठे झाले शरद पवार यांना ऑफर द्यायला .केंद्रीय स्तरावरच्या ऑफर त्यांना द्यायला लागले. अजित पवार आणि शरद पवार कौटुंबिक नात्यांनी बांधले गेलेले आहेत .त्यांच्या काही अडचणी आहेत त्या संदर्भात ते भेटले. शरद पवारांना ऑफर देतील इतके अजित पवार हे इतके मोठे नेते नाही. अजित पवारांना शरद पवार यांनी बनवलं आहे. ते भारतीय जनता पक्षाबरोबर त्यांच्या हयातीमध्ये हात मिळवणी करतील असे मला वाटत नाही. ते नव्याने पक्ष बांधणीला बाहेर पडले आहेत. दोन दिवसापूर्वी सोलापूरला होते आज संभाजीनगरला आहेत पुढे जात आहेत. एका जिद्दीने ते मैदानात उतरले आहेत. त्यामुळे आता हे सोडून गेलेले त्यांचा काही संबंध राहिलेला नाही असे त्यांच्या बोलण्यातून आणि त्यांच्या कृतीतून दिसत आहे. एखाद दुसऱ्या भेटीतून असे अर्थ काढणं चुकीचे आहे. मुंबईत होणाऱ्या ३१ आणि १ तारखेला होणाऱ्या इंडिया अलायन्स च्या बैठकी संदर्भात कालच माझी त्यांच्याबरोबर चर्चा झाली.

तसेच संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांच्या व्हायरल व्हिडिओवर देखील प्रतिक्रिया देखील दिली आहे. ते म्हणाले आहेत की, मी पाहिला तो व्हिडिओ झेंडा फडकलाच नाही. हा शुभ शकुन त्यांच्यासाठी नाही. २०२४ चा तिरंगा हा इंडिया अलायन्सचे प्रधानमंत्री लाल किल्ल्यावरून झेंडा फडकवतील आणि देश त्या शुभ घटनेची वाट पाहत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची आमचं व्यक्तिगत वाद असण्याचे कारण नाही. ज्या प्रकारच्या सुडाचं बदल्याचं बिनबुडाचं राजकारण केला आहे त्यामुळेच विरोधकांना एकत्र येण्याची संधी मिळाली. २०२४ निवडणुका आम्ही जिंकू आणि पुढचा स्वतंत्र्य दिनाचा लाल किल्ल्यावरचा सोहळा नरेंद्र मोदी हे गुजरात मध्ये आपल्या घरी बसून पाहतील किंवा माजी पंतप्रधान म्हणून समोर बसून पाहतील आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत.

हे ही वाचा:

Chandrayaan-3 सॉफ्ट लँडिंगपासून केवळ एका कक्षेच्या अंतरावर, जाणून घ्या सविस्तर…

पनवेलमध्ये मनसेचा आज निर्धार मेळावा, काय बोलणार Raj Thackeray?

पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाची इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करणारे मुंबईतील दोन तरुण अटकेत…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss