Wednesday, September 25, 2024

Latest Posts

‘त्या’ ऑफरवरून जितेंद्र आव्हाड यांनी दिली प्रतिक्रिया

अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळपास ४० आमदारांनी बंडखोरी केली आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या सत्तासंघर्षाला सुरुवात झाली आहे. अजित पवारांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं पक्षचिन्ह आणि नाव यावरून दोन्ही गटांकडून दावे-प्रतिदावे केले जात आहे.

अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळपास ४० आमदारांनी बंडखोरी केली आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या सत्तासंघर्षाला सुरुवात झाली आहे. अजित पवारांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं पक्षचिन्ह आणि नाव यावरून दोन्ही गटांकडून दावे-प्रतिदावे केले जात आहे. दरम्यान, शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मोठं विधान केलं आहे. मागील दोन दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार काय भूमिका घेणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. त्यातच काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाकडून तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. तसेच शरद पवार यांना केंद्रीयमंत्री पदाची ऑफर देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. यावर शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सोबत आले तरच अजित पवारांना मुख्यमंत्री होता येईल ही अट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवार समोर ठेवली आहे. त्यामुळेच अजित पवार हे शरद पवारांचे समर्थन मिळवण्यासाठी वारंवार त्यांची भेट घेत असल्याचा दावा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना हे वक्तव्य केलं आहे.’ जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार शरद पवार भेटीवर म्हटलं की, वडेट्टीवार काय म्हणाले याच्यावर मी स्पष्टीकरण देणं हास्यास्पद होईल. पण शरद पवारांना कोण ऑफर देऊ शकतो हे म्हणजे या वर्षातील सर्वात मोठा जोक आहे. पवार साहेबांची उंची किती, त्यांची लोकसभेतील कारकीर्द किती? त्यांना कोण ऑफर देणार? असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला.

जे कोणी काय बोलतात ते बोलू द्या. पवार साहेबांनी सांगोल्याच्या पत्रकार परिषदेत स्पष्टपणे सांगितलं आहे की, मी कुठेही जाणार नाही. मी जातीयवादी पक्षाची हातमिळवणी करणार नाही. मी पुरोगामी विचारांचा पुरस्कर्ता आहे. मी तेच विचार पुढे घेऊन जाणार आहे, असे त्यांनी म्हटल्याचं आव्हाड यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान राष्ट्रवादीच्या मागेपुढे संभ्रम निर्माण करायचा आहे, हाच एक उद्देश आहे. शरद पवार यांच्या विचारधारेत फरक पडलेला नाही. ते पुरोगामी विचार घेऊनच चाललेत यापुढे पुरोगामी विचार घेऊनच चालतील, असा दावाही आव्हाड यांनी केला.

हे ही वाचा:

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची अजित पवार गटावर टीका

अजित पवारांनी दिले शरद पवारांना आव्हान

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss