Tuesday, September 24, 2024

Latest Posts

आता भारतात आयफोन १५ चं उत्पादन सुरु; ‘या’ कंपनीसोबत असणार करार…

भारतात आयफोन १५ चं उत्पादन सुरु झालं आहे. अ‍ॅपलची (Apple) नेक्स्ट जनरेशन आयफोन १५ (iPhone 15) सीरिज लवकरच बाजारात दाखल होणार आहे.

भारतात आयफोन १५ चं उत्पादन सुरु झालं आहे. अ‍ॅपलची (Apple) नेक्स्ट जनरेशन आयफोन १५ (iPhone 15) सीरिज लवकरच बाजारात दाखल होणार आहे. त्याआधी भारतात आयफोन १५ चं उत्पादन सुरु करण्यात आलं आहे. अ‍ॅपल कंपनीची पुरवठादार फॉक्सकॉन कंपनीने (Foxconn Technology Group) भारतामध्ये आयफोन १५ तयार करण्यास सुरुवात केली आहे. अलिकडच्या काळात आयफोनची क्रेझ वाढली आहे. भारतातही लाखो आयफोन युजर्स आहेत. अ‍ॅपल कंपनी (Apple) लवकरच बाजारात आयफोन १५ सीरिज लाँच करणार आहे. त्याआधी भारतीयांसाठी एक चांगली बातमी आहे. आता ‘मेड इन चायना’ (Made in China) नाही तर ‘मेड इन इंडिया’ (Made in India) आयफोन (iPhone) वापरता येणार आहेत.

तामिळनाडूमध्ये (Tamil Nadu) आयफोन १५ च्या प्रोडक्शनला सुरुवात करण्यात आली आहे. अ‍ॅपल कंपनी सप्टेंबर २०२३ मध्ये आयफोन १५ (iPhone 15) सिरीज लाँच करणार आहे. फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी ग्रुपने तामिळनाडूमधील श्रीपेरंबुदुर (Sriperumbudur) येथील प्लांटमध्ये आयफोन १५ च्या उत्पादनाला सुरुवात केली आहे. आयफोन १५ (iPhone 15) चं उत्पादन सुरू झाल्याचं आता समोर आलं आहे. महत्त्वाचं म्हणजे अ‍ॅपल कंपनी (Apple) ने अ‍ॅपल एअरपॉड्स (Apple Airpods) बनवण्यासाठीही फॉक्सकॉन कंपनीशी करार केला आहे. फॉक्सकॉनने (Foxconn) हैदराबाद प्लांटसाठी ४०० दशलक्ष डॉलरच्या गुंतवणुकीला मंजुरी दिली आहे. डिसेंबर २०२४ पर्यंत येथे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू होण्याची अपेक्षा आहे. तसेच फॉक्सकॉनच्या हैदराबाद कारखान्यात एअरपॉड्स बनवले जातील. डिसेंबरपर्यंत कारखाना मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू होण्याची शक्यता आहे.

अ‍ॅपलचं सर्वाधिक उत्पादन हे सध्या चीनमधून (China) केलं जात आहे. पण चीनमधील कोविड लॉकडाऊन (Covid Lockdown), आंतरराष्ट्रीय स्तरावर बदलती भूमिका तसेच वॉशिंग्टन आणि बीजिंग यांच्यातील वाढत्या तणावानंतर अ‍ॅपलने चीनमधून मॅन्युफॅक्चरिंग कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. अ‍ॅपलकडून म्यॅन्युफॅक्चरिंगसाठी चीन वगळता इतर देशांतील पर्यायांची चाचपणी सुरू आहे. अ‍ॅपलने पूर्वीच्या तुलनेत सध्या चीनमधून उत्पादन कमी केलं असून इतर देशांमध्ये उत्पादन वाढवण्यावर भर देण्याचं काम सुरू आहे. भारत हा त्यासाठी एक पर्याय बनला असून भारतात भविष्यात अ‍ॅपलचं उत्पादन मोठ्या प्रमाणात केलं जाऊ शकतं. आयफोनच्या या सीरिजमध्ये कंपनी त्यांचे बटनलेस (Buttonless) डीझाइन फिचर या सीरिजमध्ये ठेवणार नसल्याचं सांगितलं जात आहे. तसेच आयफोन त्यांच्या जुन्या म्युट बटनामध्ये देखील बदल करणार आहे. अ‍ॅपलच्या अल्ट्रा वॉचचे (Ultra Watch) कस्टमायजेबल फिचर बटन या सीरिजमध्ये असल्याचं म्हटलं जात आहे. पण हे फिचर आयफोन प्रोच्या काही मर्यादित मॉडेलमध्येच ठेवण्यात येईल, असंही सांगितलं जातं आहे.

हे ही वाचा:

BIG BOSS OTT winner एल्विश यादवबद्दल आलिया म्हणाली …

अमोल कोल्हेंच्या शिरूर मतदार संघावर ठाकरे गटाचा दावा ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss