spot_img
Tuesday, September 24, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

रस्त्यांवरील खड्डयांविरोधात मनसे कार्यकर्त्ये आक्रमक

मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेवरून मनसे कार्यकर्त्ये आक्रमक झाले आहेत. रत्नागिरीच्या पालीतील ठेकेदाराचा जेसीबी मनसे कार्यकर्त्यांनी फोडला आहे.

रस्त्यांवरील खड्डयांविरोधात मनसे कार्यकर्त्ये प्रचंड आक्रमक झाल्याचे पाहायला मिळतं आहे. यावेळी कार्यकर्त्यांकडून राज्यात अनेक ठिकाणी रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत आंदोलन करण्यात आले आहे. तसेच काही ठिकाणी तोडफोडही झाली आहे. एकूणच मनसैनिकांनी आक्रमक होत आंदोलनं सुरु केले आहे. तसेच मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेवरून मनसे कार्यकर्त्ये आक्रमक झाले आहेत. रत्नागिरीच्या पालीतील ठेकेदाराचा जेसीबी मनसे कार्यकर्त्यांनी फोडला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पनवेलमध्ये झालेल्या मेळाव्यात भाष्य करताना रस्त्यांच्या दुरवस्थेसाठी सरकारवर हल्लाबोल करत टिका केली होती.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांकडून होत असलेल्या या आंदोलनांचे समर्थन केले आहे. ‘आमची मुलं रस्त्यावर उतरली. त्यांनी आक्रमक होत आंदोलनं देखील सुरु केली आहेत. मी त्याला काहीच करू शकत नाही. आतापर्यंत १६ ठिकाणी आंदोलनं झाली आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर देखील आंदोलन सुरू आहे. प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलनं करणार आहे. यातून कदाचित सरकारचे डोळे उघडतील.’ असे वक्तव्य राज ठाकरेंनी केले आहे. तसेच रस्त्यावरून गरोदर स्त्रिया जात असतात, लोकं जात असतात. त्यामुळे नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या, असे आवाहनही राज ठाकरे यांनी मनसे कार्यर्त्यांना केले आहे.

‘खड्डे काही पहिल्यांदा पडलेले नाहीत. लोक त्यातूनच प्रवास करतात. मला लोकांचं आश्चर्य वाटतं. जे लोकप्रतिनिधी तुम्ही निवडून देता ते खड्डे आणि इतर प्रश्न उभे करतात. त्यांनाच तुम्ही पुन्हा निवडून देता. जोपर्यंत लोकांचा राग मतपेटीत उतरत नाही, तोपर्यंत रस्त्यावरचे खड्डे बुजवले जाणार नाहीत’, असे राज ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

याआधी टोलविरोधात मनसे आक्रमक झाली होती. तसेच मुंबईतील मराठी पाट्यांबाबतही मनसे आक्रमक आंदेलन केले होते. यावेळीही खळ्ळखट्याक पद्धतीने मनसेने आक्रमक आंदोलन केले होते. आता पुन्हा एकदा रस्त्यांवरील खड्डयांविरोधात मनसे कार्यकर्ते आक्रमक होत असल्याचे दिसत आहे.

हे ही वाचा:

शरद पवारांच्या सभेला उत्तर देण्यासाठी अजित पवार गटाची बीडमध्ये उत्तर सभा?

रस्ता पूर्ण न करताच नितीन गडकरी करणार लोकार्पण, मविआचा आरोप

सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकार करणार एक लाख कोटींची तरतूद

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss