spot_img
Tuesday, September 24, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

भारताबद्दल खरा अभिमान हा नरेंद्र मोदी यांच्यासोबत काम करणाऱ्यांनाचं…, उदय सामंत

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी या होत आहेत. अश्यातच विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये सारखेच आरोप प्रत्यारोप हे दिसून येत आहेत. अश्यातच शिंदे गटाचे उदय सामंत यांनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी या होत आहेत. अश्यातच विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये सारखेच आरोप प्रत्यारोप हे दिसून येत आहेत. अश्यातच शिंदे गटाचे उदय सामंत यांनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

यावेळी बोलत असताना संजय राऊत म्हणाले आहेत की, विरोधकांकडे भरपूर वेळ आहे असा निवांत वेळ त्यांना पुढील वीस- पंचवीस वर्षे मिळो त्यांना दुसरं काहीही काम नाही रोजच ते बोलत असतात रोजचा त्यांचा इव्हेंट चालू असतो. आमच्या नेत्यांबद्दल नाराजी सांगणारी जी सूत्र आहेत त्यांचीच एसआयटी चौकशी लागली पाहिजे. तसेच उदय सामंत यांनी महविकास आघाडीवर देखील त्यांची पहिली प्रतिक्रिया ही दिली आहे. ते म्हणाले आहेत की, महाविकास आघाडीचे सध्या जे काही राजकारण चालू आहे, त्यानुसार नेत्यांना स्वबळावर लढण्याची माहिती देखील देण्यात आलेली आहे. अजित पवार आणि शरद पवार यांची जरी भेट झाली असली, तरी शरद पवार यांच्या भूमिकेबद्दल ही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

तसेच उदय सामंत पुढे म्हणाले आहेत की, इंडिया आघाडीची बैठक घेऊन फार मोठं काही साध्य होईल असं मला वाटत नाही. भारत देशाबद्दल खरा अभिमान कोणाला आहे हे या देशातल्या जनतेला माहिती आहे. ३७० काश्मीर मधलं कलम कोणी रद्द केलं,राम मंदिर कोणी बांधलेलं आहे हे जनतेने पाहिलं आहे. भारताबद्दल खरा अभिमान हा नरेंद्र मोदी यांच्यासोबत काम करणाऱ्यांनाचं आहे. तसेच पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर राखणं ही फक्त महाराष्ट्राचीच नाही, तर अखंड देशाची जबाबदारी आहे. शिवरायांच्या बाबतीत जर असं कोणी काही करत असेल तर त्याचा मी जाहीर निषेध करतो. तर कर्नाटक मध्ये सरकार आहे काँग्रेसचं, ज्यावेळी कर्नाटकात भाजपचे सरकार होतं त्यावेळी हेच काँग्रेसवाले आम्हाला शिकवत होते. महाराष्ट्रात आमची सत्ता आली त्यावेळी मात्र सीमा भागातील पाण्याचे प्रश्न, रस्त्यांचे प्रश्न यावर एकनाथ शिंदेंनी काम केलेलं आहे असं देखील सामनात म्हणाले आहेत.

तर पुढे उदय सामंत यांनी भरत गोगावले यांच्यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले आहेत की, भरत गोगावले असे अनेक किस्से सांगतात ते माझे जवळचे मित्र आहेत. भरत गोगावले हे जे काही बोलले ते त्यांच्या भाषणाची शैली आहे ते कोणावरही नाराज नाहीत. गोगावले यांनी कोणालाही दुखावण्यासारखं वक्तव्य केलेलं नाही. खासदारकीच्या आणि आमदारकीच्या जागांबाबत तीन नेते मंडळी बसून फॉर्मुला ठरवतील.

हे ही वाचा: 

शरद पवारांच्या सभेला उत्तर देण्यासाठी अजित पवार गटाची बीडमध्ये उत्तर सभा?

देवेंद्र फडणवीसांनी दिला उद्धव ठाकरेंना टोला

अमित शहांचा मोठा प्लॅन, यूपी, बिहार, गुजरात आणि महाराष्ट्रातील…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss