spot_img
Tuesday, September 24, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

जळगावमधील आर एल ज्वेलर्सची सलग दुसऱ्या दिवशी ईडीकडून चौकशी सुरु

राजमल लखीचंद ज्वेलर्सने स्टेट बँकेकडून घेतलेल्या कर्जासंदर्भात आणि थकीत कर्जामुळे ही चौकशी सुरु असल्याचे समोर आले आहे. दरम्यान गेल्या चोवीस तापांपासून ही कारवाई सुरु असल्याचे समोर आले आहे.

जळगावमधील राजमल लखीचंद ज्वेलर्सची (Rajaml Lakhichand Jewellers) सलग दुसऱ्या दिवशी ईडीकडून चौकशी सुरु आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. राजमल लखीचंद ज्वेलर्सने स्टेट बँकेकडून घेतलेल्या कर्जासंदर्भात आणि थकीत कर्जामुळे ही चौकशी सुरु असल्याचे समोर आले आहे. दरम्यान गेल्या चोवीस तापांपासून ही कारवाई सुरु असल्याचे समोर आले आहे. तसेच आज पहाटे चार वाजेपर्यंत ईडीच्या अधिकाऱ्यांकडून राजमल लखीचंद ज्वेलर्समधील सोन्याच्या दागिन्यांचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर आर्थिक व्यवहार कागदपत्रांची तपासणी देखील करण्यात येणार आहे.

जळगावातील आर एलच्या विविध शाखांवर छापा टाकण्यात आला आहे. त्यामध्ये आर एल ज्वेलर्स, मानराज आणि नेक्सा शोरूमचा समावेश आहे. यावेळी माजी आमदार मनीष जैन (Manish Jain) यांचीही ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. मात्र माजी खासदार ईश्वर जैन (Ishwar Jain) हे गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने त्यांची चौकशी करण्यात आली नाही. माजी खासदार ईश्वरलाल जैन हे राजमल लखीचंद ज्वेलर्स ग्रुपचे संचालक आहेत. तसेच शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती.

गुरुवारी सायंकाळपासून ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली आहे. तेव्हापासून राजमल लखीचंद ग्रुपमधील सर्वांचे मोबाईल बंद केले गेले आहेत. गेल्या चोवीस तासांपासून सुरू असलेली ही कारवाई आजही दिवसभर सुरु राहणार आहे. त्यामुळे या ईडी तपासात नेमके काय समोर येणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मागील काळातही सीबीआयने चौकशी केली होती. दरम्यान या ईडी कारवाई मागे राजकारण असल्याच्या राजकीय क्षेत्रात चर्चा रंगू लागल्या आहेत.

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी खासदार ईश्वर बाबूजी जैन यांनी राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार यांना पाठिंबा दिला होता. तर ईश्वर बाबूजी जैन यांचे चिरंजीव माजी विधानपरिषद आमदार मनीष जैन यांनी शरद पवार यांची साथ सोडून ते अजित पवार यांच्या सोबत गेले होते. ईश्वर बाबूजी जैन हे दहा ते पंधरा वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचे संपूर्ण राज्याचे खजिनदार होते.

हे ही वाचा:

राज्यात गणोशोत्सव, दिवाळीत 100 रुपयात आनंदाचा शिधा

सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांमध्येही वाघांचं दर्शन होणार, वनमंत्र्यांची माहिती

श्रावण महिन्यात Trimbakeshwar मंदिरात दर्शनासाठी जायचं? तर ही बातमी नक्की वाचा…

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss