spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

येणारी २५ वर्षे मोठ्या संकल्पाची – पंतप्रधान नरेंद्र मोदी

आज देशाचा ७५ वा स्वातंत्र्यदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. आज शासकीय कार्यालये, संस्था, दिल्लीतील लाल किल्ला येथे ध्वजारोहण करून स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात आहे.

आज देशाचा ७५ वा स्वातंत्र्यदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. आज शासकीय कार्यालये, संस्था, दिल्लीतील लाल किल्ला येथे ध्वजारोहण करून स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे सलग नवव्यांदा देशाला संबोधन करणार आहेत. तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आज भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण समारंभास उपस्थित राहणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. ध्वजारोहण सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री तसेच अन्य मान्यवर लाल किल्ल्यावर उपस्थित झाले आहेत. स्वतंत्रदिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच लाल किल्ल्यावर पोहोचण्याआधी नरेंद्र मोदी यांनी राजघाटावर जाऊन देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांना अभिवादन केले. ध्वजारोहण झाल्यानंतर मोदी यांनी देशाला संबोधित केले. याआधी त्यांना भारतीय संरक्षण दलाकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना अनेक मुद्दे मांडले. त्यात प्रथमतः त्यांनी देश आता ५ मोठे संकल्प घेऊन पुढे जाईल. असे सांगितले, हे पाच संकल्प असतील –

  • विकसित भारत हा एकच संकल्प घेऊन आता भारत पुढे चालेल.
  • कोणाही भारतीयाच्या मनात गुलामीचा अंशही राहायला नको.
  • आपल्याला आपल्या वारशाचा अभिमान असायला हवा. चौथा संकल्प म्हणजे एकता आणि एकजूट.
  • १३० कोटी देशवासियांच्यात एकता असयला हवी.
  • पाचवा संकल्प म्हणजे नागरिकांचं कर्तव्य. ज्यातून पंतप्रधान, मुख्यमंत्रीही सुटू शकत नाही.

देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी बलिदान देणाऱ्या हुताम्यांना अभिवादन करत पंतप्रधानांनी देशवासीयांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पंतप्रधानांनी ‘जय जवान, जवान किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान’, असा नवा नारा दिला आहे. लाल बहादूर शास्त्रींनी ‘जय जवान, जय किसान’चा नारा दिला. यानंतर अटल बिहारी वाजपेयींनी त्यात ‘जय विज्ञान’ जोडले. आणि आता त्यात ‘जय अनुसंधान’ जोडण्याची वेळ आली आहे. आता ‘जय जवान, जवान किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान’, असा नारा पंतप्रधानांनी दिला आहे.

पुढील २५ वर्षांसाठी योजना तयार
पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे की, आपण येत्या २५ वर्षांसाठी आपले संकल्प पंचप्राणावर केंद्रीत करायला हवं. २०४७ मध्ये या पंचप्राणांसह स्वातंत्र्याची १०० वर्षे पूर्ण होतील, तेव्हा आपल्याला भारतप्रेमींचीही स्वप्नं पूर्ण करायची आहेत. आपल्याला नव्या आत्मनिर्भर भारताचा संकल्प करायचा आहे. स्वत: सह भारतालाही आत्मनिर्भर बनवायचं आहे. यासाठी आपल्याला एकत्र येऊन काम करायचं आहे. विविधतेतील एकता संपूर्ण जगाला दाखवायची आहे, असं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केलं आहे.

भारताकडे पाहण्याचा जगाचा दृष्टीकोन बदलला
भारताकडे पाहण्याचा जगाचा दृष्टीकोन बदलला आहे. विश्व भारताकडे गर्वाने, अपेक्षाने पाहतोय. प्रत्येक समस्येचं समाधान शोधण्यासाठी जग आपल्याकडे पाहत आहे. जगाच्या विचारांमधील हा बदल आपल्या ७५ वर्षांच्या यात्रेचा परिणाम आहे. आज जग अपेक्षा घेऊन जगत आहे.

माझा पूर्ण कालखंड लोकांच्या कल्याणासाठी घालवला
भारत देश हा लोकशाहीची मात्रभूमी आहे. आमच्याकडे अनमोल सामर्थ्य असल्याचे भारताने सिद्ध केले आहे. २०१४ साली देशाने मला संधी दिला. स्वातंत्र्यानंतर जन्म झालेला मी पहिला पंतप्रधान आहे. मी माझा पूर्ण कालखंड लोकांच्या कल्याणासाठी घालवला. दलित, दिव्यांग, महिला, शेतकरी, आदिवासी यांना समर्थ बनवण्यासाठी मी स्वत:ला समर्पित केलं. भारताच्या लोकांमध्ये आकांक्षा आहेत. आज भारताच्या प्रत्येक कोपऱ्यात, वर्गात आकाक्षा फुलू लागल्या आहेत. देशाचा प्रत्येक नागरिक बदलायला पाहतोय.

युवकानी देशाला विकसित बनवण्याची शपथ घ्यावी
स्वप्न जेव्हा मोठे असतात, संकल्प बडे असतात तेव्हा शक्तीदेखील मोठी असते. स्वातंत्र्याचा संकल्प मोठा होता. हा संकल्प मोठा असला तरी तो पूर्ण केला गेला. आगामी २५ वर्षात आपल्याला भारताला विकसित करायचे आहे. देशाच्या स्वातंत्र्याला १०० वर्षे होतील तेव्हा आजचे युकव ५० ते ५५ वर्षांचे होतील. तुमचे हे वय देशाला विकसित करण्याचे वय आहे. युवकांनो तिरंग्याची शपथ घेऊन पुढे जा. हा देश विकसित असेल, यासाठी काम करा. भारत जेव्हा मोठे स्वप्न पाहतो, ते करुनदेखील दाखवतो.

महिलांचा अपमान न करण्याचा संकल्प करूया
एकता आणि एकजुटतेचा विषयही खूप महत्त्वाचा आहे. कोण उच्च कोणी नीच नाही हा भाव एकतेसाठी खूप महत्त्वाचा आहे. मुल आणि मुलगी समान मानले नाही तर एकता प्रत्यक्षात येऊ शकत नाही. ‘भारत प्रथम’ हा निकष ठेवला तर एकता पुर्णत्वास येईल. आपण अनेक मार्गांनी महिलांचा अपमान करतो. महिलांचा अपमान न करण्याचा संकल्प घेऊ शकतो का. महिलांचा गौरव राष्ट्राचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.

आमचा आर्थिक विकासच देशाला दिशा देणार
डिजिटल क्रांतीमुळे जगासमोर भारताचा आदर्श युवा पिढीसाठी नवं स्वप्न नव्या क्षेत्रांना घेऊन भारत प्रगती करत आहे. भारताचा आर्थिक विकास भारतात होत आहे.

खासगी क्षेत्रालाही नरेंद्र मोदींचे आवाहन
देश नवनिर्मितीचं केंद्र बनत आहे. भारतीयांना आत्मनिर्भर बनायचे आहे. आत्मनिर्भर बनून जगासमोर आदर्श ठेऊया. विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहे. खासगी क्षेत्रालाही मी आवाहन करत आहे. लघू-सूक्ष्म उद्योगांसोबत जगात आदर्श निर्माण करायचा आहे.

हे ही वाचा :-

ठाण्यात मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ध्वजारोहण

या तिरंगी पदार्थांसह आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करा स्वातंत्र्य दिन

 

Latest Posts

Don't Miss