spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

डुडलमधून भारतीय संस्कृती दर्शवत गुगलने दिली स्वातंत्र्यदिनाची भेट

डूडलमधील हे पतंग भारताने आतापर्यंत मिळवलेल्या यशाच्या उंचीचे प्रतीक दर्शवित आहेत.

आज भारतात विविध पद्धतींनी भारताचा ७५ वा स्वातंत्र्यदिन (Independence Day) म्हणजेच अमृतमहोत्त्सव साजरा केला जात आहे. या वर्षी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी गुगलने (Google) देखील एका खास डुडलच्या (Doodle) माध्यमातून भारताला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.यामध्ये काही माणसं रंगीबेरंगी पतंग उडवताना दाखवण्यात आले आहेत आणि या पटांगणावर ७५ असही लिहिलेल दिसतंय. डूडलमधील हे पतंग भारताने आतापर्यंत मिळवलेल्या यशाच्या उंचीचे प्रतीक दर्शवित आहेत.

या खास प्रसंगी गुगलने एक GIF तयार केले आहे. हे GIF केरळमधील कलाकार नीती हिने साकारले आहे. या GIF मध्ये भारतीय नागरिक भारताला १५ ऑगस्ट रोजी पूर्ण झालेली ७५ वर्षे साजरी करताना दिसत आहेत. डूडलमध्ये ७५ असं लिहिलेल्या पतंग हे भारताने इतक्या वर्षात केलेल्या प्रगतीच प्रतीक आहेत.

डूडलबद्दल बोलताना केरळमधील GIF ची साकारकर्ती नीती म्हणाली की, भारतात पतंग हे फार पूर्वीपासून उडवले जातात. पतंग हा भारतीय संस्कृतीचा आणि भारत स्वातंत्रता मोहिमेचा एक अविभाज्य भाग आहे. जेव्हा भारतावर इंग्रजांचं राज्य होत तेव्हा सरकारचा निषेध करण्यासाठी, ब्रिटीश राजवटीविरुद्ध घोषणा लिहिण्यासाठी पतंगाचा वापर केला जात असे.

भारताच्या या ७५ स्वातंत्र्य दिनानिमित्त गुगलने 2 मिनिटांचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये 1947 मध्ये भारताच्या स्वातंत्र्यापासून आतापर्यंतचा 75 वर्षांचा प्रवास दाखवण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला गेल्या 75 वर्षांचा भारतीय इतिहास केवळ 2 मिनिटांत दिसणार आहे. याआधी गुगलने आपल्या वेबसाइटवर भारत की उडान नावाचे डिजिटल पेज लाईव्ह केले होते. गुगल आर्ट अँड कल्चरच्या पेजवरहे लाईव्ह पाहता येईल. गुगलने यासाठी एक नवीन वेबसाइट तयार केली आहे, ज्याचे नाव आहे गुगल आर्ट अँड कल्चर. या वेबसाईटवर महात्मा गांधी, भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यासह सर्व नेत्यांची प्रतिमा दाखवण्यात आली आहे.

हे ही वाचा:

CM Eknath Shinde यांच्या हस्ते ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त मंत्रालयात राष्ट्रध्वजारोहण

Youth general knowledge of independence day | भारत देशाची भावी तरुण पिढी

 

Latest Posts

Don't Miss