spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

रेल्वे मंडळाने घेतला मोठा निर्णय, ‘या’ कालावधीत होणार डोंबिवली रेल्वे स्थानकाचा कायापालट…

मध्य रेल्वे मार्गावरील (Central Railway Route) सर्वाधिक गर्दीचे रेल्वे स्थानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवली (Dombivli) रेल्वे स्थानकाचा कायापालट (transformation) करण्याचा निर्णय रेल्वे मंडळाने (Railway Board) घेतला आहे.

मध्य रेल्वे मार्गावरील (Central Railway Route) सर्वाधिक गर्दीचे रेल्वे स्थानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवली (Dombivli) रेल्वे स्थानकाचा कायापालट (transformation) करण्याचा निर्णय रेल्वे मंडळाने (Railway Board) घेतला आहे. रेल्वे स्थानकात प्रवाशांना अत्यावश्यक सर्व पंचतारांकीत सुविधा देण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाने केले आहे. गेल्या २० वर्षाच्या काळात दुसऱ्यांदा रेल्वे स्थानकाचा चेहरामोहरा बदलला जाणार आहे. मुंबई रेल्वे विकास मंडळाच्या माध्यमातून टप्पा तीन ए अंतर्गत हे काम हाती घेण्यात येणार आहे. रेल्वे मंडळाने मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील एकूण १७ रेल्वे स्थानकांचा विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये डोंबिवली, मुलुंड (मुलुंड) रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. या दोन्ही स्थानकांच्या विकासासाठी १२० कोटीचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे, असे एका वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले.

काही वर्षापूर्वी डोंबिवली रेल्वे स्थानकातील रेल्वे तिकीट खिडकी, जिन्यांची जुनी रचना काढून नव्या रचनेत रेल्वे स्थानकाची बांधणी करण्यात आली होती. आता वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करुन रेल्वेने अत्याधुनिक, पंचतारांकीत सुविधा प्रवाशांना देण्याचा निर्णय घेतला आहे. स्वयंचलित रेल्वे स्थानके हा विचार करुन या स्थानकांचा कायापालट केला जाणार आहे. या कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. ठेकेदारांना कामाचे आदेश देण्याची प्रक्रिया सुरू आहे. पावसाळ्यानंतर म्हणजे ऑक्टोबर (October) पासून ही कामे सुरू केली जातील, असे अधिकारी म्हणाले. डोंबिवली रेल्वे स्थानकातून दररोज सुमारे तीन लाख प्रवासी येजा करतात. शहराचे नागरीकरण झाले आहे. नवी मुंबईतील विमानतळाचा विचार करुन नागरिक भविष्यातील प्रवासाचा विचार करुन शिळफाटा परिसरातील गृहसकुलांमध्ये घरे घेण्याला प्राधान्य देत आहेत. या भागातील लोकांना रेल्वे स्थानक म्हणून डोंबिवली रेल्वे स्थानकात यावे लागणार आहे. येत्या काळात डोंबिवली रेल्वे स्थानकातील वाढता प्रवासी भार विचारात घेऊन रेल्वे स्थानकात सुविधा देण्याचे नियोजन रेल्वेने केले आहे. याशिवाय रेल्वे स्थानकातील विद्युत साधनांची नव्याने उभारणी, संपर्क आणि दळणवळण सेवा केंद्रात नवीन यंत्रणा टाकण्यात येणार आहे. अत्याधुनिक सुविधांनी डोंबिवली रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार असल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

येत्या काळात कल्याण डोंबिवली पालिकेकडून (Kalyan Dombivli Municipality) डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात ठाणे (Thane) रेल्वे स्थानकासारख्या सुविधा देण्याच्या हालचाली सुरू आहेत. मागील १० वर्षापूर्वी डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसराचा ठाणे रेल्वे स्थानकासारखा कायापालट करण्याचे नियोजन कडोंमपा प्रशासनाने (Kadomampa administration) केले होते. डोंबिवली विभागीय कार्यालयाची धोकादायक इमारत पाडून टाकायची. या जागेपासून ते इंदिरा चौक, बाजीप्रभू चौक ते नेहरु रस्ता असे प्रशस्त व्यापारी संकुल उभारायचे. या वास्तुत तळ मजल्याला बस आगार, बाजुला रिक्षा वाहनतळ, पहिल्या माळ्यावरुन प्रवासी थेट रेल्वे स्थानकात किंवा तेथून वाहनतळ, बस आगारात येतील असे नियोजन होते. या संकुलात पालिकेसह इतर तलाठी, भूमी अभिलेख, महसूल विभागाची इतर कार्यालये सुरू करण्याचे नियोजन तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजय घरत (Sanjay Gharat) यांनी केले होते. या प्रकल्पाचे काम डोंबिवलीतील कोणत्या लोकप्रतिनिधीच्या ठेकेदाराने करायचे याविषयावरुन राजकीय कलगीतुरा रंगल्याने हे काम अडगळीत पडले. डोंबिवलीतील राजकीय मंडळीच्या उदासीनतेमुळे शहराचे सर्वाधिक नुकसान झाल्याची टीका नागरिक करत आहेत.

हे ही वाचा: 

Asia Cup 2023, IND vs PAK रंगणार महामुकाबला, कधी, कुठे पाहणार सामना?

लालू यादव यांनी नरेंद्र मोदींवर केली टीका, तर सुधीर मुनगंटीवार यांनी केला तीव्र संताप व्यक्त, म्हणाले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss