spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

तूरडाळीच्या भावामध्ये मोठी वाढ , तूरडाळ प्रतिकिलो १७५ रुपये

यंदाच्या वर्षी महाराष्ट्रामध्ये कमी प्रमाणात पाऊस पडल्यामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढले आहेत.

यंदाच्या वर्षी महाराष्ट्रामध्ये कमी प्रमाणात पाऊस पडल्यामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढले आहेत. यामध्ये डाळींच्या दरात मोठी वाढ झाली आहे. लातूर बाजार पेठेमध्ये तुरीच्या डाळीची आवक कमी झाली आहे. मागच्या काही महिन्यांपासून तुरीचा डाळीमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. तूर डाळीवर प्रक्रिया केल्यानंतर त्याची किंमत काही प्रमाणात वाढते. आज किरकोळ बाजारात तुरीच्या डाळीचा भाव १७५ रुपये प्रति किलो असा आहे. ऐन सणासुदीच्या वेळेस डाळीचे भाव वाढले आहेत. तर दोन महिन्यांपूर्वी १०० रुपये प्रति किलो असलेली डाळ आता १६० आणि १७५ रुपये प्रति किलो झाली आहे. हरभरा डाळ, उडीद डाळ, मसूर डाळ आणि मूग डाळीं यांचा ही भाव वाढला आहे. दोन महिन्यांमध्ये सरासरी २० तें ३० रुपये वाढले आहेत. त्यामुळे हे भाव वर्षभर तसेच राहण्याची शक्यता आहे.

गेल्यावर्षी झालेले कमी उत्पादन आणि जागतिक बाजारातील कडधान्याचे वाढते दर यामुळे बाजारात डाळींचे भाव वाढले आहेत. तूरडाळ दोन महिन्यात १०० ते ११० रुपये किलो वरून १७५ रुपये किलोवर जाऊन पोहचली आहे. हरभरा डाळ ५८ ते ६० रुपयांवरून ७० रुपये प्रतिकिलोवर गेली आहे. उडीद डाळ ९० रुपयांवरून ११० रुपये किलो एवढी झाली आहे. तर मसूर डाळीमध्ये प्रतिकिलो १० ते १२ रुपये वाढले आहेत. मूग ८० ते ८५ रुपये किलोवरून ११० रुपयांवर गेली आहे. देशभरामध्ये खरीप हंगामातील पिकांमध्ये घट झाली आहे. जून महिना संपेपर्यंत योग्य प्रमाणात पाऊस लागला तरच पिकांची लागवड केली जाते. पण यावर्षी कमी पाऊस झाल्यामुळे कडधान्यांचा पेरा घटला आहे. यंदा ११७.४४ लाख हेक्टरवर पिकांची लागवड केली आहे. तुरीची डाळ ४२. ११ लाख हेक्टर, उडीद डाळ ३१. १० लाख, मूग डाळ ३०. ६४ लाख हेक्टर, आणि इतर कडधान्य १३. ३४ लाख लागवड झाली आहे. याच्यामुळे वर्षभर डाळीचे भाव वाढतेच राहणार आहेत.

बाजारात तूर आणि हरभरा डाळीची आवक कमी प्रमाणत आहे. सरकारने हमी भाव खरेदी केंद्र सुरु केले आहे. भारतामध्ये एकूण ९५ लाख मॅट्रिक टन हरभऱ्याचे उत्पादन झाले होते. त्यापैकी ३० लाख मॅट्रिक टन हरभऱ्याची खरेदी सरकारने केली होती. तुरीला आणि हरभऱ्याला बाजारभाव चांगला मिळत असला तरी शेतकऱ्याकडे माल उपलब्ध नसल्याने आवक कमी आहे. रोज बदलणाऱ्या डाळींच्या भावामुळे ग्राहकांवरही त्याचा परिणाम दिसून येत आहे. कमी प्रमाणात पडलेल्या पावसाचा परिणाम शेतमालावर झाला असून त्यामुळे देशभरातील डाळींचे भाव मोठ्या प्रमाणार वाढले आहेत.

हे ही वाचा:

OCCRP च्या अहवालानंतर अदानी समुहाच्या शेअर्समध्ये मोठा बदल …

देवेंद्र फडणवीसच सुपर सीएम, एकनाथ शिंदे फक्त चेहरा, नाना पटोले यांचं खोचक वक्तव्य

केंद्रासमोर राज्याची भूमिका मांडण्यात राज्य सरकार अपयशी, राष्ट्रवादी काँग्रेस

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss