spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुंबईतील ठाकरे गटाचे नेते सुधीर मोरे यांनी केली आत्महत्या

मुंबईतील शिवसेना (Shiv Sena) गटातील माजी नगरसेवक सुधीर मोरे (Sudhir More) यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडला आहे.

मुंबईतील शिवसेना (Shiv Sena) गटातील माजी नगरसेवक सुधीर मोरे (Sudhir More) यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडला आहे. घाटकोपरमधील रेल्वे स्थानकांच्या रुळाजवळ त्याचा मृतदेह सापडला. सुधीर मोरे यांनी लोकल ट्रेन खाली उडी मारून आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्या मृतदेहाचे अनेक तुकडे झाले होते. गुरुवारी रात्री त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. मी एका वैयक्तिक कामासाठी जात आहे असे त्यांनी त्याच्या खासगी सुरक्षारक्षकाला सांगितले आणि ते तिथून घाटकोपर आणि विद्यविहारच्या मध्ये असलेल्या पुलाखाली गेले. तिकडे ते रात्री साडे अकराच्या सुमारास रेल्वे ट्रकवर जाऊन झोपले. कल्याणवरून मुंबईकडे जाणाऱ्या लोकलच्या मोटरमॅनच्या निर्दर्शनात येताच ट्रकवर कोणीतरी झोपल्याच पाहून वेग कमी करण्याचा प्रयत्न केला पण वेगात असलेली ट्रेन त्याच्यावरून गेली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.त्याच्या अशा जाण्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून सुधीर मोरे यांना कोणीतरी ब्लॅकमेल करत असल्याची माहिती त्याच्या घरच्यांनी दिली आहे. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केली आहे असा दावा सुधीर मोरे यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. काही कॉल रेकॉर्ड करण्यासाठी सुधीर मोरे यांनी दोन महिन्यानपूर्वी एक नवीन फोने घेतला होता . तो फोन ताब्यात घ्यावा अशी मागणी मोरेंच्या घरच्यांनी केली आहे.

सुधीर मोरे हे कट्टर शिवसैनिक होते. सुधीर मोरे हे ‘रत्नागिरी जिल्हा संपर्कप्रमुख’ होते. ते शिवसेनेचे विभाग प्रमुख आणि माझी नगरसेवक देखील होते. सुधीर मोरे यांची वाहिनी ‘स्नेहल मोरे ‘ या माझी नगरसेविका होत्या. शिवसेना गटात फूट पडल्यानंतर पण सुधीर मोरे हे ठाकरे गटासोबतच होते. त्यांनी घाटकोपर मतदार संघातून भाजप आमदार राम कदम यांच्या विरोध विधानसभा निवडणूक लढली होती पण तेव्हा त्याचा पराभव झाला होता.

हे ही वाचा:

‘One Nation One Election’ बाबत केंद्राचे मोठे पाऊल, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना

Devendra Fadnavis यांचा महावितरणच्या अधिकाऱ्यांना इशारा, शेतकऱ्यांना त्रास देऊ नका अन्यथा…

Asia Cup 2023, भारताविरुद्ध सामना व्हायच्या आधीच पाकिस्तानला मोठा धक्का, शाहिन आफ्रिदी दुखापतग्रस्त…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss