spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुंबईसह उपनगरांमध्ये पुढील 3 तासात मुसळधार पावसाची शक्यता

सकाळपासून मुंबईसह उपनगरात जोरदार पावसाचे बॅटिंग सुरू आहे. मुंबई, ठाणे पालघर जिल्ह्यात पुढील तीन तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबईत मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून राहिले आहे हिंदमाता परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. अंधेरी बोरीवली विलेपार्ले जोगेश्वरी त्याचप्रमाणे नेरूळ सानपाडा या भागातही रस्ते पाण्याखाली गेली आहेत. सोमवारपासून राज्यात पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे त्यानंतर आज दिवसभर पावसाचे एप्रिल सुरूच होती गेल्या काही तासांपासून पावसाचा जोर वाढला असून पुढील काही तास जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान तज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी पुढील तीन तासात पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

जम्मू काश्मीरात आयटीपीबी जवानांची बस दरीत कोसळली, बचाव कार्य सुरू

मुंबई सातारा पुण्याचा कोकणात मुसळधार पावसाची शक्‍यता आहे या संदर्भात आणि आपल्या ट्विटर हँडल वरून ट्विट करत सांगितले की, “मुंबई ठाण्यात सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. ढगा आकाश आणि पश्चिम मध्ये प्रदेशावरील प्रणालीचा परिणाम म्हणजेच उत्तर प्रदेश कोकण बाजूच्या खालच्या पातळीवर पश्चिमेकडील भाग मजबूत होत आहे. आणि या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून अधून मधून पाऊस हा कोसळत होता परंतु आता पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे मुंबई शहर उपनगरात मुसळधार पाऊस कोसळू लागला आहे त्यामुळे मुंबईतील सकल भागात पाणी साचले आहे. राज्यातील विविध भागात चार दिवसांपासून पावसाची सत्ताधार सुरू असल्यामुळे काही ठिकाणी सोडतात पाऊस पडत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर वर्धा गोंदिया भंडारा या सर्व ठिकाणी पावसामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्यात आले आहेत.

हेही वाचा : 

कृष्ण जन्माष्टमी विशेष, जाणून घ्या श्रीकृष्ण देवाची जन्मकथा

Latest Posts

Don't Miss