spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात भाजपकडून दहीहंडीचं आयोजन

आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मुंबई भाजप (BJP) अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने आशिष शेलार यांच्याकडे मुंबई भाजपची जबाबदारी दिली.

आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मुंबई भाजप (BJP) अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने आशिष शेलार यांच्याकडे मुंबई भाजपची जबाबदारी दिली. त्या दृष्टीने आशिष शेलार तयारीला देखील लागले आहेत. त्याचाच भाग म्हणून त्यांनी आपला मोर्चा प्रथमतः आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray) यांच्या मतदारसंघाकडे वळवला आहे. आदित्य यांच्या मतदारसंघात दहीहंडी उत्सवाचे आयोजन करुन मतदारांना आपल्या बाजूने वळवण्याचा त्यांचा इरादा दिसत आहे.

माजी पर्यटन आणि पर्यावरण आदित्य ठाकरे यांच्या मुंबईतील वरळी (Worli) या मतदारसंघात भाजपने भव्य दहीहंडी (Dahi Handi 2022) सोहळ्याचं आयोजन केले आहे. वरळीच्या जांबोरी मैदानात भाजपची दहीहंडी होणार आहे. विशेष म्हणजे वरळीत शिवसेनेचे तीन आमदार असतानाही आता दहीहंडीसाठी त्यांना दुसरं मैदान शोधावं लागत आहे. त्यामुळे दहीहंडीवरुन वरळीत राजकीय काला पाहायला मिळण्याची शक्यता आहे. आशिष शेलार यांचे निकटवर्तीय संतोष पांडे यांनी या दहीहंडी सोहळ्याचं आयोजन केलं आहे. येत्या शुक्रवारी म्हणजेच (१९ ऑगस्ट) वरळीच्या जांबोरी मैदानामध्ये हा दहीहंडी सोहळा होणार आहे.

एककीकडे शिवसेनेत फूट पडली आणि शिंदे गट वेगळा झाला. पक्षातील तब्बल ४० आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. त्यानंतर आदित्य ठाकरे राज्यातील विविध जिल्ह्यांचा दौरा करुन शिवसैनिकांशी संवाद साधत आहेत. तर दुसरीकडे भाजपचे आशिष शेलार यांनी संधी साधत आदित्य यांच्या मतदारसंघात दहीहंडी उत्सवाचं आयोजन केले आहे.

हे ही वाचा :-

जन्माष्टमीला घरी दही लावताय ? मग या गोष्टी नक्की जाणून घ्या

अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रपती, उपराष्ट्रपती व पंतप्रधानांकडून अभिवादन

Latest Posts

Don't Miss