spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

इंडिया आघाडीचा मुंबईत येऊन एक मोठा मास्टरस्ट्रोक,  महाराष्ट्रात बसणार मोठा फटका…

इंडिया आघाडीची (India Alliance) कालपासून मुंबईत (Mumbai) बैठक सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत ताकदीने भाजपच्या (BJP) विरोधात उभं राहण्यासाठी या बैठकीत चर्चा सुरू आहे.

इंडिया आघाडीची (India Alliance) कालपासून मुंबईत (Mumbai) बैठक सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत ताकदीने भाजपच्या (BJP) विरोधात उभं राहण्यासाठी या बैठकीत चर्चा सुरू आहे. काही महत्त्वाचे ठरावही करण्यात आले आहेत. या बैठकीत इंडिया आघाडीतील विरोधकांची एकजूटही अभेद्य असल्याचं दिसून आलं आहे. विरोधकांची ही तिसरी बैठक आहे. पण त्यातून एकही पक्ष गळालेला नाही. त्यामुळे विरोधक एका ध्येयाने एकत्र आल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे भाजप पुढे इंडिया आघाडीचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे. इंडिया आघाडीतील सर्वच पक्षांची एकजूट पाहून भाजपची डोकेदुखी वाढलेली असतानाच इंडिया आघाडीने मुंबईत येऊन एक मास्टरस्ट्रोक (Masterstroke) मारला आहे. त्यामुळे भाजपच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला आहे.

इंडिया आघाडीच्या बैठकीत आज तीन मोठे ठराव करण्यात आले आहेत. जागा वाटप लवकरात लवकर करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. देशातील वेगवेगळ्या भागात सभा घेऊन मोदी सरकारला (Modi Govt) एक्सपोज करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला आहे. जुडेगा भारत आणि जुडेगा इंडिया या स्लोगनचा प्रचार विविध भाषेत करण्याचा आणि सोशल मीडियातून त्याचा प्रचार करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. मात्र, यातील सर्वात मोठा मास्टरस्ट्रोक इंडिया आघाडीने मारला आहे. तो म्हणजे समन्वय समितीचा. आजच्या बैठकीत १३ सदस्यांची समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा समावेश करण्यात आला आहे. या समितीतील सदस्यांवर सर्व २८ पक्षांच्या नेत्यांशी समन्वय साधण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे. विशेष म्हणजे शरद पवार यांना या समितीत घेऊन आघाडीने मास्टर स्ट्रोक मारला आहे.

शरद पवार आपल्यासोबत येतील अशी भाजपला आशा होती. शरद पवार सोबत आल्यावर महाविकास आघाडी निष्प्रभ ठरेल असा भाजपचा अंदाज होता. पण शरद पवार यांना इंडिया आघाडीने मोठी जबाबदारी दिल्याने भाजपची मोठी गोची झाली आहे. अजितदादा गट (Ajitdada group) भाजपसोबत असला तरी शरद पवार जोपर्यंत आहेत तोपर्यंत भाजपला महाराष्ट्र (Maharashtra) जड जाणार आहे. शरद पवार यांची राज्यातील राजकारणावर मांड आहे. सत्तेचं गणित कधीही फिरवण्याची शरद पवार यांची क्षमता आहे. पवारांमुळे महाविकास आघाडी महायुतीला डोईजड जाऊ शकते हे भाजपलाही माहीत आहे. त्यातच इंडिया आघाडीने मोठी खेळी केल्यामुळे आता महाराष्ट्रातही भाजपला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे ही वाचा: 

मासिक पाळीमध्ये का जाणवतो थकवा ? जाणून घ्या सविस्तर माहिती

सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss