spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘सुभेदार’ची घौडदौड सुरुच, पहिल्याच विकेंडला जमवला…

'सुभेदार' (Subhedar) या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घौडदौड सुरू आहे. रिलीजच्या आधीपासूनच चर्चेत असलेला हा ऐतिहासिक सिनेमा (Historical cinema) प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.

‘सुभेदार’ (Subhedar) या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घौडदौड सुरू आहे. रिलीजच्या आधीपासूनच चर्चेत असलेला हा ऐतिहासिक सिनेमा (Historical cinema) प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. आतापर्यंत ‘सुभेदार’ने विक्रमी कमाई केली आहे. पहिल्या विकेंडला या सिनेमाने ८.७४ कोटींचा गल्ला जमवला आहे. ‘सुभेदार’ या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी १. १५ कोटी, दुसऱ्या दिवशी १.६८ कोटी, तिसऱ्या दिवशी २.२२ कोटी, चौथ्या दिवशी ९० लाख, पाचव्या दिवशी ९५ लाख, सहाव्या दिवशी १.०४ कोटी, सातव्या दिवशी ८० लाखांची कमाई केली आहे. एकंदरीतचा आतापर्यंत या सिनेमाने ८.७४ कोटींचा गल्ला जमवला आहे.

‘सुभेदार’चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या… (Subhedar Box Office Collection)

  • पहिला दिवस : १. १५ कोटी
  • दुसरा दिवस : १.६८ कोटी
  • तिसरा दिवस : २.२२ कोटी
  • चौथ्या दिवस : ९० लाख
  • पाचवा दिवस : ९५ लाख
  • सहावा दिवस : १.०४ कोटी
  • सातवा दिवस : ८० लाख
  • एकूण कमाई : ८.७४ कोटी

दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांनी शिवराज अष्टकातील ‘सुभेदार’ रूपी पाचवे चित्रपुष्प २५ ऑगस्टला रसिक दरबारी सादर केले आणि ३५० चित्रपटगृहांतील १००० हून अधिक शोजमधून प्रेक्षकांनीही विक्रमी प्रतिसाद दिल्याने शेकडो चित्रपटगृहांवर हाऊसफुल्लचे बोर्ड झळकल्याचे पहायला मिळातायेत. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर परदेशातही ‘सुभेदार’ चित्रपटाची जोरदार घोडदौड सुरू आहे. पहिल्याच वीकेंडला चित्रपटाने पाच करोडहून अधिकची विक्रमी कमाई केली आहे. या जबरदस्त यशानंतर पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यातही ‘सुभेदार’ चित्रपटाची बॅाक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरूच राहील, असा अंदाज वर्तवला जात आहे.

‘सुभेदार’ सिनेमातील गाण्यांना रसिकांचा जोरदार प्रतिसाद लाभत आहे. ‘आले मराठे’ या गाण्यावर सिनेमागृहांमध्येच रसिक बेधुंद होऊन भगवे झेंडे घेऊन नाचत आहेत. मुखानं ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष करत प्रेक्षकांचे लहान-मोठे गट एकत्रितपणे सिनेमा पहायला गर्दी करत आहेत. ‘सुभेदार’ सिनेमाने बॉक्स ऑफिसचा गड दणक्यात सर केला आहे. महाराष्ट्रातल्या शाळकरी विद्यार्थ्यांसाठी (School students) ‘सुभेदार’च्या टीमने एक विशेष ऑफर (Special offer) ठेवली आहे. पीव्हीआर (PVR) आणि आयनॉक्समध्ये (Inox) प्रेक्षकांना हा सिनेमा पाहता येणार आहे. फक्त १४० रुपयांत प्रेक्षक हा सिनेमा पाहू शकतात. पण या विशेष ऑफरसाठी खास अटीदेखील आहेत.

हे ही वाचा: 

इंडिया आघाडीचा मुंबईत येऊन एक मोठा मास्टरस्ट्रोक,  महाराष्ट्रात बसणार मोठा फटका…

ट्रेडिशनल आणि फॅन्सी लूकमध्ये सारा तेंडुलकर तिच्या चाहत्यांना देते फॅशन टिप्स…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss