spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

नंदुरबार जिह्यात लोडशेडिंगचे मोठे संकट

यंदा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) खूप कमी प्रमाणात पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.

यंदा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) खूप कमी प्रमाणात पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. अशीच परिस्थिती नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात देखील झाली आहे. या जिल्ह्यात गेल्या २५ दिवसांमध्ये खूप कमी प्रमाणात पाऊस पडला आहे. त्यामुळे शेतरकऱ्यांची फार्मर पिके (Farmer crops) वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. हवा तास पाऊस न पडल्यामुळे शेतकरी संकटामध्ये पडला आहे. त्यातच एक नवीन संकट शेतकऱ्यांसमोर आल आहे. योग्य प्रमाणात पाऊस न पडल्यामुळे पाण्याची पातळी कमी झाली आहे. अशातच महावितरणकडून लोड शेडींगला सुरुवात झाली आहे. कमी वेळ उपलब्ध असलेल्या वीज पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेले पाणी पिकांना देता येत नाहीये.

ग्रामीण भागात शेतीसाठी खूप कमी वेळ विदुत पुरवठा केला जात आहे. अवघ्या ८ तास विद्युत पुरवठा केला जात आहे. त्यातही तो व्यवस्थित मिळत नाहीये. नंदुरबार जिल्ह्यात फक्त दोन ते तीन तास वीज पुरवठा केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेले पाणीसुद्धा पिकांना देता येत नाही आहे. अशी स्थिती नंदुरबार जिल्ह्याची झाली आहे. राज्यात खुप कमी प्रमाणात पाऊस पडला आहे. या कमी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. महाराष्ट्राला आता लोडशेडिंगचा फटका बसणार आहे. मागणी वाढल्यानं आणि तुटवडा पडल्यामुळे इमर्जन्सी लोडशेडिंग (Emergency load shedding) करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच ग्रामीण भागातील लोकांना लोडशेडिंगला सामोरे जावे लागणार आहे.

यंदा महाराष्ट्रमध्ये पावसाने दांडी मारली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाण्याची साठवणूक करण्यास सुरवात केली आहे. विजेची मागणी वाढल्यामुळे लोडशेडिंग करण्यात येणार आहे. एक तास तर कधी दोन तास लोडशेडिंग करण्यात येणार आहे. वाढलेली मागणी कमी झाल्यास आणि योग्य प्रमाणात पाऊस पडल्यास लोडशेडिंग आपोआप बंद होईल असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाने दांडी मारली आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. शेतातील काही पिकांना विहिरीतील पाणी देऊन जगवण्याचा प्रयत्न केला जात आहे. महाराष्ट्रामध्ये कमी पाऊस पडल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

Latest Posts

Don't Miss