spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘Tiger 3’ चं फर्स्ट पोस्टर आऊट, सलमान आणि कतरिनाच्या लूकने केलं सर्वानांच…

बॉलिवूड अभिनेता (Bollywood actor) सलमान खान (Salman Khan) आणि कतरिना कैफच्या (Katrina Kaif) बहुचर्चित 'टायगर ३' (Tiger 3) या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

बॉलिवूड अभिनेता (Bollywood actor) सलमान खान (Salman Khan) आणि कतरिना कैफच्या (Katrina Kaif) बहुचर्चित ‘टायगर ३’ (Tiger 3) या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या सिनेमाचं पहिलं पोस्टर (Poster) आऊट झालं आहे. सलमान खान (Salman Khan) आणि कतरिना कैफच्या (Katrina Kaif) नव्या लूकने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

बॉलिवूडचा ‘भाईजान’ (Bhaijaan) अर्थात सलमान खानने सोशल मीडियावर ‘टायगर ३’ सिनेमाचं फर्स्ट लूक पोस्टर शेअर केलं आहे. पोस्टर शेअर करत त्याने या सिनेमाची रिलीज डेटही जाहीर केली आहे. सलमानने लिहिलं आहे,”लवकरच येतोय… दिवाळी २०२३ मध्ये ‘टायगर ३’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार…तुमच्या जवळील सिनेमागृहात हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषेत हा सिनेमा नक्की पाहा”. ‘टायगर ३’च्या या पहिल्या पोस्टरमधील सलमान खान (Salman Khan) आणि कतरिना कैफच्या (Katrina Kaif) लूकने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पोस्टरमध्ये दोघांच्याही हातात बंदूक दिसत आहे. ‘एक था टायगर’ (Ek Tha Tiger) आणि ‘टायगर जिंदा है’ (Ek Tha Tiger) नंतर ‘टायगर ३’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे.

‘एक था टायगर’ हा सिनेमा २०१२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर (box office) चांगलाच धमाका केला. या सिनेमात सलमान खान टायगर नामक रॉ एजंटच्या (Raw Agent) भूमिकेत तर कतरिना आयएसआय एजंट (ISI agent) जोयाच्या भूमिकेत होती. सलमान आणि कतरिनाची रुपेरी पडद्यावरील केमिस्ट्री चाहत्यांच्या पसंतीस उतरली. त्यानंतर ही जोडी २०१७ मध्ये ‘टायगर जिंदा है’ हा सिनेमा घेऊन आली. ‘टायगर जिंदा है’ या सिनेमानेही बॉक्स ऑफिसवर चांगलाच धमाका केला. ‘टायगर ३’ हा वाईआरएफ स्पाई यूनिवर्सचा (YRF Spy Universe) पाचवा सिनेमा आहे. सहावर्षांनी सलमान खान आणि कतरिना कैफची जोडी रुपेरी पडद्यावर कमबॅक (Comeback) करणार आहे. टायगर आणि जोयाच्या जोडीला पुन्हा एकदा पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. आता ‘टायगर ३’ हा सिनेमा ‘टायगर जिंदा है’ आणि ‘एक था टायगर’ या सिनेमांचा रेकॉर्ड ब्रेक (Record break) करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हे ही वाचा: 

ASIA CUP 2023, आज होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात भारताची संभाव्य प्लेइंग ११

Sharad Pawar आज जालन्यातील मराठा आंदोलकांची घेणार भेट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss