spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Janmashtami 2023, तुम्हाला माहित आहे का? कृष्ण आणि राधाने लग्न का केलं नव्हतं?

मथुरा वृंदावनच नाहीत तर देशातील अनेक भागात जन्माष्टमीच्या उत्सव गुण्यागोविंदाने साजरा केला जातो. कृष्णजन्माष्टमीच्या अनेक पौराणिक कथा आहेत.

मथुरा वृंदावनच नाहीत तर देशातील अनेक भागात जन्माष्टमीच्या उत्सव गुण्यागोविंदाने साजरा केला जातो. कृष्णजन्माष्टमीच्या अनेक पौराणिक कथा आहेत. त्यातील एक कथा आहे, ती कृष्ण आणि राधाची. हा सण दरवर्षीच येतो मात्र आता या कृष्णजन्माष्टमीला राधा आणि कृष्णाची भेट कशी झाली आणि त्यांनी लग्न का केले नाही हे तुम्हाला माहित आहे का ? तसेच जगात असे अनेक जोडपे आहेत जे राधा कृष्णाच्या जोडीकडे आदर्श म्हणून बघतात. चला तर जाणुन घेऊया राधा कृष्णाचे काही किस्से.

पृथ्वीवर जन्म घेतल्यावर कसे भेटले राधा कृष्ण?

कृष्ण जेव्हा ४-५ वर्षाचे होते तेव्हा ते त्याच्या वडिलांसोबत गायींना चारा घालण्यासाठी गेले होते. त्याच्या वडिलांना चक्कीत करण्यासाठी त्यांनी वसंत ऋतूत वादळ आणल होत आणि त्याबद्दल त्याना काहीच माहिती नाही असे त्यांनी वडिलांना दाखवले होते. त्यानंतर अचानक पाऊस पडला आणि कृष्ण रडायला लागले. ते रडत रडत आपल्या वडिलांना जाऊन बिलगले आणि त्याच वेळी तिथून एक सुंदर कन्या जात होती. त्याच्या वडिलांनी कृष्णाला तिच्या जवळ सांभाळण्यासाठी बसवलं आणि ते गायींना चरण्यास घेऊन गेले. तेव्हा कृष्ण त्याच्या खऱ्या अवतारात आले आणि त्यांनी विचारलं तुला आठवतो स्वर्गात आपण असे बसायचो. ती कन्या त्याला उत्तर देत म्हणाली ‘हो’ . ती कन्या दुसरी कोणी नसून ती राधा होती. अश्या प्रकारे पृथ्वीवर राधा आणि कृष्ण पहिल्यादा भेटले होते. तसेच असं मानलं जात की, कृष्ण आणि राधा वृंदावनमध्ये अनेकदा भेटायचे. कृष्ण रोज ओढयाजवळ बासुरी वाजवायचे आणि राधा बासुरीचा मधुर सूर ऐकताच त्यांना भेटायला यायची. मान्यतेनुसार राधा आणि कृष्ण कधी वेगळे झाले नव्हते. राधा आणि कृष्णाचं नातं भक्तीच शुद्ध स्वरूप आहे.

राधा आणि कृष्णाने का लग्न केले नाही?

राधा आणि कृष्णाने लग्न न करण्याचा निर्णय यासाठी घेतला होता की, प्रेम आणि लग्न या गोष्टी फार वेगळ्या आहेत असं त्यांना वाटायच. प्रेम हे शारिरीक नसून भक्ती आणि शुद्धतेचा प्रतिक आहे. हे जगाला दाखवून देण्यासाठी एकमेकांशी लग्न न करत भक्तीच निखळ रूप जगापुढे ठेवले. तर काही मान्यतेनुसार राधा स्वतः ला कृष्णाच्या योग्य समजत नव्हती. त्यामुळे त्यांनी लग्न केल नव्हतं.

Latest Posts

Don't Miss