Wednesday, September 25, 2024

Latest Posts

गौतमी पाटीलचे वडील सापडले गंभीर अवस्थेत…

गौतमी पाटील ही तिच्या बोल्ड लुकमुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्या नृत्यातील अश्लील हावभावामुळे नेहमीच तिच्यावर टीका केली जाते.

गौतमी पाटील ही तिच्या बोल्ड लुकमुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्या नृत्यातील अश्लील हावभावामुळे नेहमीच तिच्यावर टीका केली जाते. पण तरीसुद्धा तिने अख्या महाराष्ट्राला आपल्या नृत्यामुळे वेड लावले आहे. तिचा ‘घुंगरू’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतच तीच युट्युबवरील ‘ माझा कारभार सोपा नसतोय र’ हे गाणं प्रदर्शित झाल आहे. तिच्या कार्यक्रमात तुफान गर्दी , नोटांची उधळण नेहमीच पाहायला मिळते. अनेकांनी तिच्यावर आरोप देखील केले आहेत पण तरीसुद्धा तिच्या लावणीची क्रेझ कायम आहे.

महाराष्ट्रभरामध्ये गौतमी पाटील (Gautami Patil) ही तिच्या लावणी नृत्यामुळे नेहमीच चर्चेत असते. लहान मोठ्यांपासून प्रत्येक जणांमध्ये गौतमी पाटीलची क्रेझ आहे. पण आता याच गौतमी पाटीलचे वडील बेवारस अवस्थेमध्ये सापडले आहे. रवींद्र बाबुराव नेरपगारे पाटील (Rabindra Baburao Nerapagare Patil) हे तिच्या वडिलांचे नाव आहे. सध्या त्यांना उपचारासाठी रुग्णायात दाखल केले आहे. धुळे शहरातील आजळकर नगर भागात एक व्यक्ती मरणावस्थेत असल्याची माहिती स्वराज्य फाउंडेशनच्या (Swarajya Foundation) दुर्गेश चव्हाण याना मिळाली होती. त्यानंतर दुर्गेश चव्हाण यांनी घटना स्थळी जाऊन त्या व्यक्तीला हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले . नंतर त्यांनी त्याची ओळख पटवण्यासाठी समाज माध्यमांवर फोटो आणि त्याचे आधार कार्ड वरील माहिती टाकली.

सदर व्यक्ती ही गौतमी पाटीलचे वडील रवींद्र बाबुराव पाटील असल्याचे समजले आहे. ही माहिती समोर आल्यानंतर दुर्गेश चव्हाण यांनी गौतमीच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. त्यानंतर त्या गौतमीच्या नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. तिच्या वडिलांची परिस्थिती सध्या स्थिर असल्याची माहिती स्वराज्य फाउंडेशनचे दुर्गेश चव्हाण यांनी दिली आहे. गौतमी पाटीलच्या वडिलांवर धुळे येथील हिरे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती खालवल्यानांतर तिची काकी आणि चुत बहीण हे हिरे रुग्णलयात दाखल झाले. पण त्यानंतर त्यांनी सांगितले गौतमी पाटीलशी आमचा काही संबंध नाही.

Latest Posts

Don't Miss