Wednesday, September 25, 2024

Latest Posts

मराठा समाजानं शांतता राखावी, उदयनराजे भोसले म्हणले…

जालन्यामध्ये घडलेल्या घटनेचे संपूर्ण राज्यभरात पडसाद सध्या उमटत असल्याचं पहायला मिळत आहे. सोलापुरात देखील सखल मराठा समाजाकडून आंदोलन करण्यात आले आहे. राज्यभरात विविध ठिकाणाहून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे.

जालन्यामध्ये घडलेल्या घटनेचे संपूर्ण राज्यभरात पडसाद सध्या उमटत असल्याचं पहायला मिळत आहे. सोलापुरात देखील सखल मराठा समाजाकडून आंदोलन करण्यात आले आहे. राज्यभरात विविध ठिकाणाहून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे. त्यामुळे यावर शासन आता कोणती भूमिका घेणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. तर या संपूर्ण प्रकाराची जबाबदारी गृहमंत्र्यांनी घ्यावी अशी मागणी सध्या विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे आता जालना जिच्यासोबत बाकी देखील जिल्ह्यामध्ये आंदोलनाच इशारा देत आहेत. आणि त्यामुळे समाजाचे वातावरण हे बिघडू शकते. राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांची आज भेट घेतली.

मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) शासनाची भूमिका आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू असलेल्या सुनावणीबाबत माहिती देण्यासाठी मराठा आरक्षण समिती सदस्य या नात्यानं पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांची आज भेट घेतली. यावेळी पालकमंत्री देसाई व खासदार उदयनराजे यांच्यामध्ये सविस्तर चर्चा झाली. त्यामध्ये देसाई यांनी न्यायालयामध्ये सुरू असलेली प्रक्रिया या विषयी माहिती दिली. तसेच आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला देण्यात येणाऱ्या सवलतींविषयी सविस्तर माहितीही दिली.

यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पोलीस अधीक्षक समीर शेख उपस्थित होते. दरम्यान, मराठा समाजानं शांतता राखावी, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये व आरक्षणाच्या बाबत शासनास सहकार्य करावे, असे आवाहनही पालकमंत्री देसाई व खासदार उदयनराजे भोसले यांनी केले. जालना येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पोलीस दलानं सतर्क राहावं, तसंच कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही देसाई यांनी दिल्या. त्याचबरोबर समाजामध्ये ज्या काही अनैतिक गोष्टी घडत आहेत. पोलिसांकडून लाठीचार्ज आणि आंदोलकांकडून जो काही प्रयत्न केला जात आहे त्याबाबाबत सरकारने शहतेचे पालन करण्याचे आश्वासन देखील दिले आहे. तसेच समाजात शांतता राहावी यासाठी सगळ्यांनीच पालन करणे आवश्यक आहे असे देखील सांगण्यात येत आहे.

हे ही वाचा:

माजी आमदार नरेंद्र मेहतांच्या मुलाच्या गाडीचा अपघात, वांद्रे-वरळी सी-लिंकवर …

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला विश्वास

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss