Tuesday, September 24, 2024

Latest Posts

‘गदर २’ च्या ग्रँड सक्सेस पार्टीत बॉलिवूड सेलिब्रिटींची गर्दी, शाहरुख खान-गौरी ते अजय- काजोल यांसह…

सनी देओलचा (Sunny Deol) 'गदर २' सिनेमा बॉक्स ऑफीसवर सुपरडुपरहिट झाला. सनी देओलने 'गदर २' च्या माध्यमातुन बॉक्स ऑफीसवर धुरळा उडवला.

सनी देओलचा (Sunny Deol) ‘गदर २’ सिनेमा बॉक्स ऑफीसवर सुपरडुपरहिट झाला. सनी देओलने ‘गदर २’ च्या माध्यमातुन बॉक्स ऑफीसवर धुरळा उडवला. खुप वर्षांनी सनी देओलने ‘गदर २’ च्या माध्यमातुन खऱ्या अर्थाने यश साजरं केलं. ‘गदर २’ यशस्वी झाला आणि सनी देओलने सक्सेस पार्टी (Success party) आयोजित केली. या सक्सेस पार्टीला अवघी बॉलिवूड इंडस्ट्री अवतरली. पण विशेष म्हणजे सलमान – शाहरुख – आमिर या तीन खान्सची सक्सेस पार्टीला असलेली विशेष उपस्थिती लक्षवेधी ठरली.

‘गदर २’ चित्रपटाच्या सक्सेस पार्टीमध्ये शाहरुख खान (Shah Rukh Khan), आमिर खान (Aamir Khan) आणि सलमान खान (Salman Khan) यांनी हजेरी लावली. या पार्टीच्या रेड कार्पेटवर या तिघांनी पोज दिली. शाहरुख खाननं पत्नी गौरी खानसोबत (Gauri Khan) या पार्टीला हजेरी लावली. शाहरुख खान आणि गौरी खान यांनी ‘गदर २’ चित्रपटाच्या सक्सेस पार्टीसाठी खास लूक केला होता. शाहरुखनं ब्लू टीशर्ट, ग्रे जॅकेट आणि ब्लॅक पँट असा लूक केला होता. तर गौरी ही ब्लॅक अँड व्हाईट जॅकेट आणि ब्लॅक पँट अशा कॅज्युअल लूकमध्ये दिसली. अजय देवगण (Ajay Devgan), काजोल (Kajol) यांनी देखील ‘गदर २’ चित्रपटाच्या सक्सेस पार्टीमध्ये हजेरी लावली होती. सलमान खान (Salman Khan) टी – शर्ट आणि जीन्स या फॉर्मल अवतारात सक्सेस पार्टीला उपस्थित होता. यावेळी कार्तिक आर्यनने (Karthik Aryan) सलमानसोबत खास पोझ दिली. याशिवाय ‘गदर २’ च्या सक्सेस पार्टीत आमिर खान सुद्धा दिसला. टी शर्ट आणि जीन्स या साध्या पण आकर्षक अंदाजात आमिर खानची उपस्थिती सर्वांचं लक्ष वेधून घेत होती. एकुणच ‘गदर २’ च्या सक्सेस पार्टीत तिन्ही खान्सचा विशेष अंदाच लक्षवेधी ठरला.

अभिनेता कार्तिक आर्यन, अनन्या पांडे, विकी कौशल, अभिषेक बच्चन, अनुपम खेर, सुनिल शेट्टी हे कलाकार देखील ‘गदर २’ चित्रपटाच्या सक्सेस पार्टीमध्ये उपस्थित होते. ‘गदर २’ हा चित्रपट ११ ऑगस्ट २०२३ रोजी रिलीज झाला. अनिल शर्मा (Anil Sharma) यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. या चित्रपटात सनी देओलसोबतच अमिषा पटेल,लव्ह सिन्हा, सिमरित कौर आणि उत्कर्ष शर्मा या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. ‘गदर २’ हा २००१ मध्ये रिलीज झालेल्या ‘गदर एक प्रेम कथा’ या चित्रपटाचा सिक्वेल आहे. ‘गदर २’ चित्रपटामध्ये सनी देओलने तारा सिंहची भूमिका साकारली तर अमिषा पटेलने सकिनाची भूमिका साकारली.

हे ही वाचा: 

पुण्यातील भोर मधील धबधब्यात बुडून एका तरुणाचा मृत्यू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला विश्वास

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss