Tuesday, September 24, 2024

Latest Posts

लग्नाची लगबग आणि सुरु झाले कपल्सचे पहिले केळवण

सोशल मीडियावर अमृता देशमुख (Amruta Deshmukh) आणि प्रसाद जवादे (Prasad Javade) ही जोडी खूप जास्त वायरल होत आहे.

सोशल मीडियावर अमृता देशमुख (Amruta Deshmukh) आणि प्रसाद जवादे (Prasad Javade) ही जोडी खूप जास्त वायरल होत आहे. ‘ बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi ४ ) चौथ्या पर्वात या दोघांनी सहभाग घेतला होता. या दोघांनाचा काही दिवसापूर्वी साखरपुडा पार पडला आता लवकरच ते दोघे विवाह बंधनात अडकणार आहेत. प्रसाद आणि अमृताचे नुकतेच केळवण झाले आहे. या केळवणाचे प्रसाद आणि अमृताने काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहे. त्यानी या केळवणात खास उखाणे घेतले आहेत. अमृताने सोशल मीडियावरील व्हिडिओला कॅपेंशन दिले आहे ” ‘आजोबांनी (आईच्या बाबांनी) वयाच्या 87 व्या वर्षी सगळं planning करून, भेटवस्तू, बुके ह्या सगळ्यांनी सजवून केळवणाला सुरवात केली..एवढं सगळं झाल्यावर मग “उखाणा घ्या” ह्या ऑर्डर ला नाकारणार कसं.’

पहिल्या केळवणाच्या वेळी अमृताने घेतलेला खास उखाणा ‘ नाटकाच्या प्रयोगांसाठी फिरते मी वणवण, प्रसादचं नाव घेते आजोबांनी केलं पहिलं केळवण’ असा उखाणा घेतला आहे. त्यानंतर प्रसादने सुद्धा उखाणा घेतला ‘कितीही वणवण फिरलीस तरी माझं चित्त फक्त तुझ्यापाशी, अमृताचं नाव घेतो आज केळवणाच्या दिवशी’.

अमृता आणि प्रसाद याची जोडी सध्या सोशल मीडियावर खूप फेमस झाली आहे. त्या दोघांनी एकत्र बनवलेले रील व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडतात.अमृता आणि प्रसाद यांनी केळवणासाठी खास लूक केला होता. तेव्हा अमृताने ऑफ व्हाईट रंगाची साडी आणि गोल्डन दागिने घातले होते. प्रसाद अमृताची बिग बॉस च्या घरात चांगली मैत्री झाली. त्यानंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. आता काहीदिवसातंच प्रसाद आणि अमृता लग्न करणार आहेत.

Latest Posts

Don't Miss