spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

५१३ किलो ड्रग्ज जप्त, गुजरातमध्ये मुंबई पोलिसांची कारवाई

अंमली पदार्थविरोधी मुंबई पोलिसांच्या ( Mumbai Police ) पथकाने गुजरातमध्ये (Gujarat) कारवाई केली आहे. गुजरातमधील भरुच जिल्ह्यातील अंकलेश्वर भागात ड्रग्ज तयार करणारा कारखाना उघडकीस आणला आहे.

अंमली पदार्थविरोधी मुंबई पोलिसांच्या ( Mumbai Police ) पथकाने गुजरातमध्ये (Gujarat) कारवाई केली आहे. गुजरातमधील भरुच जिल्ह्यातील अंकलेश्वर भागात ड्रग्ज तयार करणारा कारखाना उघडकीस आणला आहे. यावेळी मारलेल्या छाप्यात मुंबई पोलिसांनी जवळपास ५१३ किलोचे एमडी ड्रग्ज जप्त ( Drugs Case ) केले आहे. या अंमली पदार्थाची किंमत १०२६ कोटी रुपये आहे. यावेळी पोलिसांनी एका महिलेसह सात जणांना अटक केली आहे.

या प्रकरणाचा तपास करताना अंमली पदार्थ पुरवठ्याचे धागेदोरे गुजरातमध्ये असल्याचे पोलिसांना आढळून आले. त्यानंतर अंमली पदार्थविरोधी पथकाने गुजरातमधील अंकलेश्वर भागात कारखान्यावर छापा मारला. यावेळी पोलिसांनी ५१३ किलो एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला. पोलिसांनी सात जणांना अटक केली असून यात एका महिलेचा समावेश आहे. त्यातील पाच जणांना न्यायलयीन कोठडीत पाठवण्यात आले. तर दोघांना अंमली पदार्थ विरोधी पथकाकडे सोपवण्यात आले आहे.

भारत-पाकिस्तानमधील आंतरराष्ट्रीय समुद्री सीमेवर गुजरात एटीएसनं कोस्ट गार्डच्या मदतीनं ड्रग्ज माफियांविरोधात इतिहासातील सगळ्यात मोठी संयुक्त मोहीम पूर्ण केली. गुजरात पोलिसांनी गेल्या सहा महिन्यात NDPS ACT अंतर्गत ४२२ गुन्हे दाखल केले आणि जवळ जवळ ६६७ ड्रग्स माफियांना तुरुंगात टाकले. त्यांच्याकडून २५ हजार ६९९ किलो ड्रग्ज जप्त केले. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत जवळ जवळ पाच हजार कोटी रुपये आहे.

मागील काही महिन्यापासून मु्ंबई पोलीस दलाच्या अंमली पदार्थविरोधी पथकाकडून अंमली पदार्थ विरोधी कारवाई सुरू आहे. याच कारवाईमध्ये काही महिन्यांपूर्वी शिवाजी नगर भागातून अंमली पदार्थाचा साठा जप्त केला होता. पोलिसांनी गोवंडीतील शिवाजी नगर येथून मार्च २०२२ मध्ये पहिल्या आरोपीला अटक केली. त्याच्याकडून २५० ग्रॅम मेफेड्रोन जप्त केले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी ७०० किलो अंमली पदार्थ जप्त केले होते. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली होती.

अंमली पदार्थाची तस्करी करणारी ही आंतरराज्य टोळी असावी असा पोलिसांनी संशय आहे. मागील काही महिन्यांपासून गुजरातमध्ये सातत्याने मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थाचा साठा आढळून येत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा :- 

अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला जाब विचारणार, नाना पाटोले

सत्ता आली म्हणजे मस्ती आली का? अजित पवारांचा राज्य सरकारला सवाल

Latest Posts

Don't Miss